Jeev Majha Guntala serial latest update antara give her baby to shweta audience trolls angry reaction sakal
मनोरंजन

Jeev Majha Guntala: नको आता ही सीरियल.. 'त्या' एका सीन नंतर 'जीव माझा गुंतला' मालिकेवर भडकले प्रेक्षक

'जीव माझा गुंतला' मालिका वादाच्या भोवऱ्यात..

नीलेश अडसूळ

सध्या कलर्स मराठी वरील 'जीव माझा गुंतला ही मालिका चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत सातत्याने काहीना काही ट्विस्ट येत आहेत. या मालिकेतून मल्हार आणि अंतरा यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. एका उद्योगपती आणि रिक्षा चालवणाऱ्या मुलीची की प्रेमकहाणी आहे. अनेक संकटानंतर एकत्र आलेले अंतरा आणि मल्हार यांच्या नात्यात पुन्हा नवे वादळ आले आहे.

अंतरा गरोदर असल्या पासूनच तिच्यावर अनेक संकटं आली. अगदी ते मूल तिचं नसून दुसऱ्या कुणाचं असल्यापासून ते तिचं पोटातलं मूल मारण्यापर्यन्त सर्व कुरघोडी श्वेताने केल्या. श्वेता ही अंतराची बहीण असूनही ती अंतराच्या बाबतीत रोज नव्या कुरघोडी करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच अंतराला मूल झालं. याच दरम्यान श्वेताही गरोदर होती. श्वेताने अंतराचं मूल मारण्यासाठी एक डाव आखला होता, ज्यामध्ये श्वेताच फसली आणि तिचे मूल त्यात दगावले. त्यानंतर अंतराला वेड्याचा झटका आल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आणि तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी अंतराने तिचं मूल श्वेताला द्यावं असा सल्ला डॉक्टर देतात.

श्वेताने इतकं राजकारण करूनही, मल्हार आणि अंतरा आपलं मूल श्वेताला द्यायला तयार झाले. परंतु असे असूनही श्वेता त्या बाळाची काळजी घेताना कमी परत आहे.पण हे पाहून चाहते अजूनच संतप्त झाले आहे.

ही मालिका (marathi serial) तातडीने बंद करा, आम्ही ही मालिका पाहणं सोडलं, हा मूर्खपणा आहे, अशा कमेंट नेटकऱ्यांनी सोशल मिडियावर केल्या आहेत. अंतरा आणि मल्हार या कलाकारांच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री योगिता चव्हाण ने बाळासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी या मालिकेवर सडकून टीका केली.

परंतु 'मालिकेत दाखवण्यात आलेले दृश्य काही काळाने बदलेल आणि तुमच्या मानसारखेच होईल'अशी ग्वाही अखेर कलाकारांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लुटलं, लुटलं, लुटलं! अनैतिक विजय, पराभव दिसताच ममता बॅनर्जी संतापल्या; १६व्या फेरीअखेर पिछाडीवर

MI vs LSG Live: ६,६,६,६,६,६,६,६! निकोलस पूरनचा रुद्रावतार; १६ चेंडूंत अर्धशतक अन् नाही राहिला वैभव सूर्यवंशीचा 'तो' भारी विक्रम

Junnar Alumni Meet: जुन्नरमध्ये 1994 च्या माजी विद्यार्थ्यांची भेट; शालेय आठवणींना उजाळा

​Palghar News : जिल्ह्यातील ५७ शाळांमधील ७ हजार विद्यार्थी शिक्षणाला मुकणार; श्रमजीवी संघटना आक्रमक

Solapur BJP Celebration: मंगळवेढ्यात भाजपकडून ‘झालमुडी-जिलेबी’ वाटप, बाईक रॅली व फटाक्यांची आतषबाजी

SCROLL FOR NEXT