Shiv Thakare  esakal
मनोरंजन

Jhalak Dikhhla Jaa 11: फिनाले आधीच शिव ठाकरे 'झलक दिखला जा'मधून आऊट; 'हे' स्पर्धक पोहोचले अंतिम फेरीत

Shiv Thakare: 'झलक दिखला जा 11' च्या (Jhalak Dikhhla Jaa 11) फिनालेच्या एक आठवडा आधी शिव ठाकरे (Shiv Thakare) हा शोमधून आऊट झाला आहे. शिव हा कार्यक्रमातून एलिमिनेट झाल्यानंतर त्याचे चाहते निराश झाले आहेत.

priyanka kulkarni

Jhalak Dikhhla Jaa 11: छोट्या पडद्यावरील 'झलक दिखला जा 11' (Jhalak Dikhhla Jaa 11) या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. या कार्यक्रमातील सेलिब्रिटींच्या परफॉर्मन्सचं अनेक जण कौतुक करतात. शिव ठाकरेनं देखील या कार्यक्रमात भाग घेतला होता. पण फिनालेच्या एक आठवडा आधी शिव ठाकरे (Shiv Thakare) हा शोमधून आऊट झाला आहे. शिव हा कार्यक्रमातून एलिमिनेट झाल्यानंतर त्याचे चाहते निराश झाले आहेत.

चाहते झाले निराश

शिव 'झलक दिखला जा 11' या कार्यक्रमातून आऊट झाल्यानंतर त्याचे चाहते नाराज झाले आहे. अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन नाराजी व्यक्त केली आहे. "जे लोक मोठे नाव मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करतात त्यांच्याबद्दल मला खूप आदर वाठतो. शिवला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा", असं ट्वीट शिवच्या एका चाहत्यानं केलं आहे.

शिवच्या आणखी एका चाहत्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "तो खरोखर अंतिम फेरीत जाण्यास पात्र होता!"

'हे' दोन स्पर्धक पोहोचले अंतिम फेरीत

फराह खान, अरशद वारसी आणि मलायका अरोरा हे 'झलक दिखला जा 11' या कार्यक्रमाचे परीक्षक देखील शिव आऊट झाल्यानंतर भावूक झाले. मनीषा राणी आणि शोएब इब्राहिम हे दोघे या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत.

कधी होणार ग्रँड फिनाले?

झलक दिखला जा 11 चा फिनाले मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. शोचा फिनाले 2 किंवा 3 मार्चला होऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. तुम्ही सोनी लिव्ह ॲपवर या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पाहू शकता. 'झलक दिखला जा 11' या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखल, पाहा थेट प्रक्षेपण

Pune Metro : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; रात्री 11 वाजेपर्यंत सलग 41 तास धावणार मेट्रो, प्रवाशांना दिलासा

Latest Maharashtra News Updates : मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

10,000 कोटींच्या मालकाची बायको, परंतु अभिनेत्री राहिली गटारीशेजारच्या झोपडीत, कारण ऐकून थक्क व्हाल

Chandra Grahan 2025: पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी लागणार चंद्रग्रहण, एक दिवस आधीच करा तुळशीशी संबंधित 'ही' कामे

SCROLL FOR NEXT