Gashmeer Mahajani esakal
मनोरंजन

Gashmeer Mahajani: 'इंटिमेट सीन करायला आवडेल पण...'

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता याशिवाय मराठी चित्रपटांतून लक्षवेधी भूमिका करुन प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या गश्मीरचं एक विधान चर्चेत आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Jhalak Dikhhla Jaa Fame Gashmeer Mahajani: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता याशिवाय मराठी चित्रपटांतून लक्षवेधी भूमिका करुन प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या गश्मीरचं एक विधान चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावर आपल्या फोटो, व्हिडिओमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या गश्मीरचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याचा फोटो, रिल्सला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे.

गश्मीरनं टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये काम करताना तसेच चित्रपटांमध्ये भूमिका करताना बोल्ड सीन करण्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ज्याची चर्चा सुरु झाली आहे. गश्मीरनं आपल्याला बोल्ड सीन करायला आवडेल. मात्र ते करताना काही अटी आहेत. त्या पूर्ण होणार असतील तर दिग्दर्शकाची ती डिमांड आपल्याला पूर्ण करण्यास कोणतीही हरकत नाही. असे गश्मीर म्हणतो. डान्स रियॅलिटी शो झलक दिखला जामधील वेगवेगळ्या परफॉर्मन्सनं गश्मीरनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

गश्मीर हा सध्या सर्वात लोकप्रिय स्पर्धक आहे. त्याची चर्चा सुरु आहे. त्याच्या सादरीकरणानं त्यानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. देशातील सर्वात लोकप्रिय शो म्हणून सध्या झलक दिखला जा ची चर्चा आहे. त्यात गश्मीरची हवा आहे. या शोमध्ये तो जिंकणार असल्याचे सांगितले जात आहे. संभाव्य विजेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. याशिवाय गश्मीरनं स्टार प्लस वाहिनीवरील इमली मालिकेतून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

गश्मीर आपल्या एका मुलाखतीमध्ये म्हणतो की, मी एक अॅव्हरेज डान्सर आहे. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. मुलाखतीमध्ये गश्मीरला ओटीटीवर इंटिमेट सीन्स साकारण्याविषयी काय सांगशील असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणतो, माझ्या त्या सीनमुळे संबंधित कलाकृतीला प्रेक्षकांची दाद मिळणार असेल तर मी ते सीन करेल. स्टोरीला प्रभावित करण्यास तो सीन महत्वाचा असल्यास आपण ती भूमिका करायला तयार आहोत. असे गश्मीरनं म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT