jhimma 2 first day box office collection siddharth chandekar sayali sanjeev shivani surve SAKAL
मनोरंजन

Jhimma 2: झिम्मा २ ची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफीसवर कोट्यावधी कमाई

झिम्मा २ पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचं हाऊसफुल्ल प्रेम मिळवलंय

Devendra Jadhav

Jhimma 2 First Day Box Office Collection: हेमंत ढोमे लिखित - दिग्दर्शित झिम्मा २ काल रिलीज झालाय. झिम्मा २ ची गेल्या महिन्याभरापासुन सगळीकडे चर्चा होती. अखेर झिम्मा २ काल हाऊसफुल्ल गर्दीत सुरु झालाय. झिम्मा २ ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफीसवर कोट्यावधी कमाई केलीय. पहिल्याच दिवशी कमाईचे आकडे बघता झिम्मा २ प्रेक्षकांना आवडला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

पाहूया झिम्मा २ ने किती पहिल्या दिवशी बॉक्स ऑफीसवर किती कमाई केलीय ते.

झिम्मा २ ची पहिल्या दिवशी बॉक्स कमाई

sacnilk च्या अहवालानुसार, झिम्मा २ ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफीसवर १.२० कोटीची कमाई केलीय. त्यामुळे पहिल्याच दिवशी झिम्मा २ ने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय, यात शंका नाही.

झिम्मा चा पहिला भाग कोवीड नंतर रिलीज झालेला. त्यावेळी सुद्धा झिम्माच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली होती. आता झिम्मा २ ची बॉक्स ऑफीसवर कमाई बघता हा सिनेमा सुद्धा कमाईचे सर्व आकडे मोडेल यात शंका नाही.

झिम्मा 2 सुपरहिट होणार?

महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांना झिम्मा 2 ची उत्सुकता आहे. कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत हेमंत ढोमे दिग्दर्शित हा सिनेमा रिलीज झालाय.

या सिनेमात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर  यांच्या दमदार भुमिका आहेत. 'झिम्मा २'ची सफर २४ नोव्हेंबरपासुन सुरु झालीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोधैर्य योजना काय आहे? सोलापूरमधील ९९ अत्याचार पीडित महिला, मुलींना १.११ कोटीचे ‘मनोधैर्य’; विधी सेवा प्राधिकरणाकडून मिळते कायदेशीर मदत मोफत

Shashikant Shinde: जनतेमुळेच माझे अस्तित्व अबाधित: प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; सध्याच्या राजकारणाचा जनतेला किळस वाटताेय

Pune Municipal Elections 2025: प्रभागरचना २०१७ प्रमाणेच; महापालिका निवडणूक, प्रारूप रचना सरकारला सादर

परीक्षेसाठी १०७ केंद्रे अन्‌ भरारी पथके अवघी तीन! वर्गातील CCTV कागदावरच; २३ सप्टेंबरपासून परीक्षा, अभियांत्रिकीची परीक्षा ३१ ऑक्टोबरपासून

Mahadev Munde case: २१ महिन्यांनंतर महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासाला वेग; एसआयटी प्रमुख पंकज कुमावतांनी घटनास्थळाची केली पाहणी

SCROLL FOR NEXT