jhimma, jhimma 2, nirmiti sawant, kshiti jog, jhimma 2 announcement SAKAL
मनोरंजन

Jhimma 2: पुन्हा रंगणार आनंदाचा खेळ, नवीन ट्रिप, नवं प्लॅनींग, यंदा कुठे? झिम्मा २ चा टिझर भेटीला

झिम्मा २ प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Devendra Jadhav

मराठी इंडस्ट्रीतील सुपरहिट सिनेमा झिम्मा सिनेमाचा पुढील भाग येतोय. झिम्मा २ प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमाचा हटके टिझर नुकताच रिलीज झाला असून टिझर मध्ये निर्मिती सावंत, अनंत जोग हे कलाकार दिसत आहेत. २०२३ ला दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय

'झिम्मा’ने एक वर्षापूर्वी बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. रसिकांना हा सिनेमा आपल्या आयुष्याच्या जवळचा वाटला. त्यामुळेच जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केले. सिनेरसिकांच्या याच प्रेमामुळे हेमंत ढोमे ‘झिम्मा २’ आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. नुकताच त्याचा एक मजेशीर अनाऊन्समेंट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित करून त्यांनी या सिनेमाची घोषणा केली आहे.

या टिझर व्हिडिओत निर्मला (निर्मिती सावंत) पुन्हा एकदा फिरायला जाण्यासाठी साहेबांकडे (अनंत जोग यांच्याकडे) परवानगी मागताना दिसत आहेत. यावेळी साहेबांनीही ट्रीपला येण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यांना नकार देत, पुन्हा एकदा ‘बाया बायाच’ ट्रीपला जायची तयारी करत असल्याचं निर्मला समजावते. साहेब मात्र निर्मलाला सूनबाईंना बरोबर घेऊन जा, असं सांगतात… आता सूनबाई कोण? यावेळी ही ट्रीप कुठे जाणार आणि यात केवळ ‘त्याच’ मैत्रिणी असणार की, आणखी मैत्रिणींची भर पडणार? हे लवकरच कळणार आहे.

बॉलीवूड मधील प्रसिद्ध निर्मिती संस्था ‘कलर यल्लो प्रोडक्शन’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय या सिनेमाची प्रस्तुती करणार आहेत. चलचित्र मंडळी आणि क्रेझी फ्यु फिल्म्स निर्मित झिम्मा २ येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आनंद एल. राय आणि क्षिती जोग या चित्रपटाचे निर्माते आहेत आणि सहनिर्माते आहेत विराज गवस, उर्फी काझमी, अजिंक्य ढमाळ. सिनेमात कलाकारांची टीम आधीचीच असणार की नवे कलाकार सहभागी असणार याचा उलगडा लवकरच होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT