jhimma 2 movie watch after abhijieet khandkekar give his reaction on social media SAKAL
मनोरंजन

Jhimma 2: मनोरंजन व्हावं म्हणून काहीतरी विनोदी... अभिजीत खांडकेकरची झिम्मा २ पाहिल्यावर प्रतिक्रिया चर्चेत

झिम्मा २ पाहिल्यावर अभिजीत खांडकेकरने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

Devendra Jadhav

Abhijeet Khandkekar on Jhimma 2: दिग्दर्शक हेमंत ढोमेचा झिम्मा २ सिनेमा आजपासुन संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झालाय. झिम्मा २ बघून प्रेक्षक आणि कलाकार त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अशातच अभिनेता अभिजीत खांडकेकरने झिम्मा २ सिनेमा बघितला. सिनेमा बघून अभिजीतने सोशल मीडियावर पोस्ट लिहीलीय जी चर्चेत आहे. काय म्हणाला अभिजीत बघा.

अभिजीत लिहीतो, "झिम्मा च्या पहिल्या भागाने अख्खा महाराष्ट्र दणाणून सोडल्यानंतर दुसऱ्या भागात काय असेल ह्याची खूप उत्सुकता होती …. आणि हेमंत did not disappoint me at all ."

अभिजीत पुढे लिहीतो, "चार पाच वेगवेगळ्या बायका , त्यांना ट्रीप वर घेऊन जाणारा एक तरूण, प्रत्येकाची आपापली बॅगेजेस आणि ह्या संपूर्ण प्रवासात त्यांनाच नाही तर आपल्यालाही पुन्हा नव्याने कळणार्या कितीतरी गोष्टी… साधी सोपी अजिबात फॅन्सी नसलेली कन्सेप्ट
पण त्यात जे काही रंग भरले आहेत…. त्याला तोड नाही. मनोरंजन व्हावं म्हणून काहीतरी विनोदी करावं की एखाद्या न बोलल्या जाणाऱ्या विषयावर प्रबोधन करावं ह्या सगळ्याच्या सीमा तोडत कथा कशी मांडावी तर अशी. इरावतीचं लिखाण कधी स्क्रिप्ट वाटतंच नाही."

अभिजीत पुढे लिहीतो, "प्रत्येक बाई वेगळी , तीचा स्वभाव , पार्श्वभूमी, इश्यू वेगळे
पण त्यांचं एकत्र येणं तुम्हाला हसवतं , रडवतं , अंतर्मुख व्हायला भाग पाडतं..
झिम्मा २ मध्ये तर कितीतरी विषयांना हाताळून, अल्लाद कथेत गुंफवत, निर्मिती ताई, सुहास ताई,क्षिती, सुचित्रा ताई अश्या बाप अभिनेत्रींना मुक्त सोडत, सिद्धार्थ, सायली, शिवानी, रिंकू अश्या मल्टी टॅलेंटेड कलाकारांकडून खुबीने त्यांची पात्र साकारून घेत आणि मुख्य म्हणजे कुठल्याही बडेजावा शिवाय हेमंत ने कमालीनं हा ‘महा झिम्मा’ सहजतेनं घातलाय. वेगवेगळे पदर गुंता होऊ न देता अलगद उलगडून दाखवावेत तर असे
सुहासताईच्या सहजतेचं काय करावं
सुचित्रा ताई सारखी आत्या तर प्रत्येक कुटुंबात असतेच
निर्मिती ताई नुसती पडद्यावर दिसली तरी हास्याचे स्फोट होतात ही तीची ताकद
क्षिती च्या सीन ची तर वाट बघावी आणि तीने सिक्सरच मारावा
सायली जशी दिसते, आहे त्या उलट कॅरेक्टर सुरेख साकारलय
एवढ्या सगळ्या बायकांना सांभाळणारा कबीर सिद्धू ने तोडलाय
विशेष कौतुक शिवानी आणि रिंकू चं - गॅंग मध्ये नविन असुनही inseparable. सुंदर कामं केलीयेत
क्षितिज च्या गाण्यांमधुन अख्खा सिनेमा कळावा इतकी अर्थपूर्ण .
अमितराज चं संगीत हे एक ह्या सगळ्यांबरोबर असणारं कॅरेक्टर च
सचिन गुरव चं पोस्टर तितकंच बोलकं."

अभिजीत शेवटी लिहीतो, "इरावती, हेमंत थॅंक यू ह्या कमाल अनुभवासाठी
आनंद एल राय आणि जिओ मुळे यंदा टीम अजुनच भक्कम झालीये त्यामुळे यंदा झिम्मा २ अजुनच गाजवणार यात शंका नाही हा रिव्ह्यू किंवा परिक्षण नाही. मी लेखक नसल्याने हे लिहिलेलं माझ्या विचारांइतकच विस्कळीत आहे पण मुद्दा हाच की चित्रपट आजपासुन प्रदर्शित होतोय , तो नवनवीन विक्रम करेलच, तुम्ही लवकरात लवकर पहा."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS T20I : भारत-ऑस्ट्रेलिया पुढचा सामना केव्हा? जाणून घ्या तारीख, ठिकाण, वेळ अन् live streaming details

Devendra Fadanvis Sugarcane Protest : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न; कोल्हापुरात ऊस दरावरून आंदोलन चिघळले, Video

Latest Marathi News Live Update : कल्याणातील रिंगरोड टप्पा ३ च्या कामाला वेग,आठ महिन्यांत पूर्णत्वाचा निर्धार

किती तो वेंधळेपणा! गाडीत बसली, स्टेअरिंग हातात घेतलं पण लगेच खाली उतरली; तेजश्रीचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल हसू

Diabetes Breakthrough Discovery: आता रक्तातूनच समजणार डायबिटीजचा धोका; आयआयटी मुंबईतील संशोधकांचा शोध

SCROLL FOR NEXT