Jhimma 
मनोरंजन

झिम्माचे रेकॉर्डब्रेक अर्धशतक; ५० दिवसांत कोट्यवधींची कमाई

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' चित्रपटात कलाकारांची मोठी फौज

स्वाती वेमूल

लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन सुपरहिट ठरलेला मराठी चित्रपट म्हणजे 'झिम्मा' (Jhimma). १९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांनीही पसंती दर्शवली असून सिनेसृष्टीतूनही ‘झिम्मा'ला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. सोशल मीडियावरही या चित्रपटाची जोरदार चर्चा अद्यापही सुरुच आहे. 'झिम्मा'चे नुकतेच पन्नास दिवस पूर्ण झाले असूनही या चित्रपटाने हाऊसफुल्लचा बोर्ड कायम ठेवला आहे . कोरोना निर्बंधांमुळे सर्व थिएटर्स पन्नास टक्के क्षमतेने सुरु करण्यात आले आहेत. त्यातही बॉलिवूडचे अनेक चित्रपट शर्यतीत असतानाही उत्तम कथालेखन, दिग्दर्शन आणि तगड्या स्टारकास्टच्या बळावर 'झिम्मा'ने अर्धशतकाचा टप्पा गाठला आहे . इतकेच नाही तर बॉक्स ऑफिसवरही ५० दिवसांत तब्बल १४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ५०व्या दिवशी झिम्मा ८० हून अधिक सिनेमागृहांमधे आहे. (Jhimma Box Office Collection)

'झिम्मा' हा चित्रपट फक्त मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरात नाही तर हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रत्येक गावोगावी पोहोचला जेथे ग्रामीण स्त्रियांनी मागण्या करून या चित्रपटाला त्यांच्या गावातील थिएटरमध्ये आणायला भाग पाडले. तसेच यावेळी असा काही ग्रामीण महिलावर्ग सुद्धा पाहायला मिळाला ज्यांनी 'झिम्मा'च्या निमित्ताने पहिल्यांदा थिएटरमध्ये जाऊन त्यांचा पहिला सिनेमा पाहिला.

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

‘झिम्मा'ला मिळणाऱ्या प्रचंड लोकप्रियेबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, 'सर्वप्रथम 'झिम्मा'ला मिळत असणाऱ्या प्रेमाबद्दल मी सर्व मराठी प्रेक्षकांचे आभार मानतो. तसेच बर्‍याच वर्षांनी एखादा मराठी चित्रपट इतके दिवस थिएटरमध्ये टिकून राहिला असून लॉकडाऊननंतर सलग पन्नास दिवस महाराष्ट्रभर थिएटरमध्ये चालणारा 'झिम्मा' पहिला चित्रपट ठरला आहे. याचा निश्चितच खूप आनंद व अभिमान वाटत आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी चित्रपटसृष्टीवर आणि चांगल्या विषयांवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. तसेच प्रेक्षकांकडून अनेक भावनिक प्रतिक्रिया येत आहेत. आपल्या कलाकृतीला मिळणार्या या सकारात्मक प्रतिक्रयेमुळे एक समाधान आहे आणि या सगळ्याचे श्रेय ‘झिम्मा’च्या टीमला आणि साहजिकच प्रेक्षकांना जाते.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : गुडलक कॅफे प्रकरणाची व्यवस्थापनाकडून दखल, कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु

SCROLL FOR NEXT