Sooraj Pancholi Acquitted Esakal
मनोरंजन

Sooraj Pancholi Acquitted: ये तो होना ही था! जिया खान प्रकरणातील निकालावरून नेटकरी भडकले

Vaishali Patil

तब्बल दहा वर्षा नंतर अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी निकाल दिला आहे. आज मुंबईच्या सीबीआय कोर्टात या प्रकरणाचा अंतिम निर्णय देण्यात आला आहे.

जिया खानचा प्रियकर सूरज पांचोलीवर जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. या प्रकरणात सूरज पांचोलीला दिलासा मिळाला आहे. जिया खान आत्महत्या प्रकरणात सीबीआयने सूरज पांचोलीची पूर्णपणे निर्दोष मुक्तता केली आहे.

आता या कोर्टाच्या निर्णयानंतर सूरज पांचोलीची आणि जियाच्या आईची दोघांच्याही प्रतिक्रिया आली आहे. एकीकडे सुरज पांचोलीने देवाचे आभार मानत सत्याचा विजय झाला असं सांगितल आहे.

जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयानंतर ट्विटरवर लोकांच्या प्रतिक्रियांचा पूर आला होता. मात्र यावेळी ट्विटवर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया दिसून येत आहेत. काहींनी सूरज पांचोलीच्या समर्थनार्थ ट्विट केले तर काहींनी जिया खानची आई राबिया खानच्या समर्थनार्थ ट्विट केले.

ट्विटरवर काहींनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. सुरज पांचोली शुक्रवारी आई जरीना वहाडसोबत कोर्टात पोहोचला. त्याचवेळी राबिया खानही कोर्टात हजर होती. आता कोर्टाने दिलेला हा निकाल अनेक नेटकऱ्यांना पटलेलं नाही.

यात काहीच आश्चर्य व्यक्त करण्यासारखं नाही आहे कराण हे सर्व होणारच होतं. तर काहींच म्हणणं आहे की, बॉलिवूड माफियांचा विजय झाला आहे.

तर दुसरीकडे सुरज पांचोलिचे चाहते त्याच्यासाठी आनंदित आहे. याप्रकरणामुळे त्याचं करिअर खराब झालं आहे. त्याच्या आयुष्यातले दहा वर्ष खराब झाल्याच ते बोलत आहेत.

तर अनेक नेटकरी जिया खानच्या आईला पाठिंबा देत आहेत. त्यांनी आपल्या मुलीला न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करत रहा असंही त्यांना सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT