Jio Mami Film Festival: मामी फिल्म फेस्टिव्हलचं शानदार उद्धाटन, या मराठी सिनेमांची पर्वणी SAKAL
मनोरंजन

Jio Mami Film Festival: मुंबईत 'मामी फिल्म फेस्टिव्हल'चं शानदार उद्धाटन, या मराठी सिनेमांची पर्वणी

जिओ मामी फिल्म फेस्टिव्हलचं मुंबईत शानदार उद्धाटन झालंय

Devendra Jadhav

Jio Mami Film Festival 2023: गेल्या अनेक दिवसांपासुन मुंबईत होणाऱ्या मामी फिल्म फेस्टिव्हलची सर्वांना उत्सुकता होती. अखेर मामी फिल्म फेस्टिव्हलचं काल मुंबईत शानदार उद्धाटन झालं.

मुंबईतील 10 दिवस चालणाऱ्या MAMI फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटन समारंभाला इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. बॉलिवुड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत मामी फिल्म फेस्टिव्हलला चार चाँद लागले.

नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरमध्ये (NMAAC) शुक्रवारी रात्री मुंबईत ५ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या फेस्टिव्हलच्या उद्घाटनाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

मामी फिल्म फेस्टिव्हलला प्रियंका चोप्रा खास लंडनहून फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती. मामीची सुरुवात हंसल मेहता यांच्या 'द बकिंगहॅम मर्डर्स' या चित्रपटाने झाली. या सिनेमात करीना कपूर प्रमुख भुमिकेत आहे.

या मराठी सिनेमांची मामीमध्ये उत्सुकता

१० दिवस चालणाऱ्या MAMI फिल्म फेस्टिव्हलमध्ये 70 भाषांमधील 250 चित्रपट आणि लघुपट दाखवले जातील. मुंबईत आठ ठिकाणी हे चित्रपट दाखवले जाणार आहेत.

मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये १२३४, आत्मपॅफ्लेट, बाईपण भारी देवा, भंडारा, गुलमोहर, वाळवी, श्यामची आई, शुर्पणखा अशा सिनेमांचा समावेश आहे

मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये या हिंदी सिनेमांची उत्सुकता

MAMI फिल्म फेस्टिव्हलमध्ये अपर्णा सेनचा 'द रेपिस्ट', अनुराग कश्यपचा कोंकणा सेन शर्मा आणि अर्जुन रामपाल अभिनीत 'केनेडी', वरुण ग्रोव्हर दिग्दर्शित 'ऑल इंडिया रँक' सनी लिओन आणि राहुल भट्ट यांचा समावेश आहे. यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शीर्षकांमध्ये ब्रॅडली कूपरच्या 'मेस्ट्रो'चाही समावेश आहे.

मामी फिल्म फेस्टिव्हलच्या उद्धाटन सोहळ्याला प्रियंका चोप्रा, एकता कपूर, करिश्मा कपूर, करीना कपूर खान, सैफ अली खान, कमल हासन, विधु विनोद चोप्रा, शबाना आजमी, सोनम कपूर, अली फजल, करण  जौहर, रितेश देशमुख, सनी लियोनी असे लोकप्रिय कलाकार उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लक्ष्मीकांत बेर्डेंनी गाजवलेलं नाटक परत येणार; 'अबब विठोबा बोलू लागला’ मध्ये हास्यजत्रेतील अभिनेता साकारणार धम्माल पुजारी

Building Collapsed: मोठी घटना! तीन मजली घराचा भाग कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू, ११ कामगार ढिगाऱ्याखाली दबले

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update: लासलगाव बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची आवक

SCROLL FOR NEXT