JNU Teaser Out Esakal
मनोरंजन

JNU Teaser Out: "पाकिस्तान का वीजा मिलना आसान है पर जेएनयू का मिलना मुश्किल"; 'जेएनयू'चा टीझर पाहिलात?

JNU Teaser Out:'जेएनयू' या चित्रपटाच्या टीझरमधील डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

JNU Teaser Out: गेल्या काही दिवसांपासून जेएनयू (JNU) हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. या पोस्टरनं अनेकांचे लक्ष वेधले. या पोस्टरमध्ये भारताचा नकाशा दाखवण्यात आला होता. हे पोस्टर बघून असा अंदाज लावला जात होता की, या चित्रपटात राजकीय मुद्दे मांडण्यात येणार आहेत. अशातच आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. या टीझरमधील डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

टीझरमधील डायलॉगनं वेधलं लक्ष

टीझरमध्ये जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटीची गोष्ट दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, या युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थी वर्गापेक्षा जास्त बातम्यांमध्ये असतात. विद्यार्थ्यांमधील राजकारणावर हा चित्रपट प्रकाश टाकणारा आहे. निवडणुकीदरम्यान युनिव्हर्सिटीमधील वातावरण देखील या टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे. "पाकिस्तान का वीजा मिलना आसान है पर जेएनयू का मिलना मुश्किल", या टीझरमधील डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

'जेएनयू' ची स्टार कास्ट

जेएनयू या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन विनय शर्मा यांनी केले आहे.या चित्रपटात सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke), उर्वशी रौतेला  (Urvashi Rautela), पियुष मिश्रा (Piyush Mishra), रवी किशन (Ravi Kishan), विजय राज (Vijay Raaz), रश्मी देसाई (Rashami Desai), अतुल पांडे  (Atul Pandey), सोनाली सहगल (Sonnalli Seygall) यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

पाहा टीझर:

कधी रिलीज होणार चित्रपट?

जेएनयू हा चित्रपट 5 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ बोडकेचा या चित्रपटातील अभिनय बघण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

सिद्धार्थनं जेएनयू चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,"जेएनयूमध्ये ज्याचं सरकार असेल, तोच देशाचे भविष्य ठरवेल. या निवडणुकीच्या मोसमात विचारधारेचा संघर्ष पाहा!भगवा या लाल,जय या सलाम"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT