john disha 
मनोरंजन

भंडारदऱ्यात जॉन-दिशाला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी

भंडारदरा परिसरात मोहीत सुरी दिग्दर्शित 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटाची शूटिंग

शांताराम काळे

अभिनेता जॉन अब्राहम John Abraham आणि दिशा पटानी Disha Patani यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'एक व्हिलन रिटर्न्स' Ek Villain Returns या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. भंडारदरा bhandardara परिसरात या चित्रपटाची शूटिंग सुरू असून ही शूटिंग पाहण्यासाठी पर्यटक व स्थानिकांनी मोठी गर्दी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या टीमला शूटिंगसाठी परवानगी कशी देण्यात आली, हा प्रश्न उपस्थित केला गेला. तर जलसंपदा अधिकारी अभिजीत देशमुख यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आल्याचं स्पष्ट केलं.

भंडारदरा परिसर हा पावसाळ्यात अधिकच विलोभनीय दिसतो. अभिजात निसर्ग सौंदर्याचं वरदान या परिसराला लाभलं आहे. भंडारदरा धरणाच्या दोनशे फूट उंचीवरील मोरीतून जेव्हा पाणी सोडलं जातं, तेव्हा याठिकाणी अत्यंत विलोभनीय धबधबा तयार होतो. हे दृश्य अंब्रेला फॉल म्हणून ओळखलं जातं. दोनशे फूट उंचीवरील मोरीच्या पुढे एक गोलाकार आकाराचा मोठा खडक आहे. वेगाने येणारे पाणी जेव्हा या खडकावरून खाली पडू लागले, तेव्हा ते उघडलेल्या छत्रीसारखे दिसते. म्हणूनच याला अंब्रेला फॉल म्हटलं जातं. याच ठिकाणी दिशा-जॉनच्या चित्रपटाची शूटिंग सुरू होती. अंब्रेला फॉल हे हजारो पर्यटकांचं आकर्षण आहे.

जॉन अब्राहम आणि दिशा पटानीसोबत चित्रपटाचे दिग्दर्शक मोहीत सुरीसुद्धा याठिकाणी उपस्थित होते. हे शूटिंग पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. या चित्रपटात तारा सुतारिया आणि अर्जुन कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दिशा आणि दिग्दर्शक मोहित सुरी यांनी 'मलंग' या चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईकरांवर जलसंकटाचे सावट! पाणीकपातीत वाढ होणार, पालिकेचा मोठा निर्णय; कधीपासून आणि का?

Video: बापरे! बनावट दुधाचा तलाव बघितला का? शेकडो टँकर्स केले रिकामे; व्हिडीओ नेमका कुठला?

लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेची वेळ बदलली, 'या' वेळेस प्रेक्षकांच्या भेटीला, कोण घेणार निरोप?

Latest Marathi News Live Update : अमरावतीत पावसाची दमदार हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

Pune News : शुल्कनिश्‍चितीनंतरही प्लंबरकडून नळजोडासाठी लूट सुरुच; महापालिका प्रशासनाचे नियंत्रण नाही

SCROLL FOR NEXT