HBD Johnny Lever esakal
मनोरंजन

HBD Johnny Lever: वडिलांना रुग्णालयात सोडून केलं होतं शूट, मनात दु:ख ठेवत लोकांना हसवतात जॉनी

इतर अभिनेत्यांप्रमाणे जॉनीचा इंडस्ट्रीमधील प्रवास सोपा नव्हता. रस्त्यावर पेन विकतही या अभिनेत्याने दिवस काढलेत.

सकाळ डिजिटल टीम

खळखळून हसायला लावत कॉमेडी करण्यात उस्ताद असणारे जॉनी लीवर यांचा आज वाढदिवस. जॉनी यांचे बरेचसे डायलॉग आजही आठवले की तेवढ्याच जोराने हसायला येतं. जवळपास तिनशेपेक्षा जास्त चित्रपटात काम करणारा हा अभिनेता चाहत्यांचा आवडता आहे. इतर अभिनेत्यांप्रमाणे जॉनीचा इंडस्ट्रीमधील प्रवास सोपा नव्हता. रस्त्यावर पेन विकतही या अभिनेत्याने दिवस काढलेत. आज त्याच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्यांच्या जीवनातील काही खास किस्से. (HBD Johnny Lever, know the story of his struggling days)

जॉनी लीवरने फक्त कॉमेडी करून लोकांना हसायलाच नाही तर त्यांच्या गंभीर अभिनयातील भूमिकेतून लोकांना रडायला देखील भाग पाडलं होतं. जॉनीचा बॉलीवुड इंडस्ट्रीमधला कुठलाही बॅकग्राऊंड नसताना स्वता:चं जोरदार व्यक्तिमत्व त्यांनी बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये निर्माण केलं. चला तर जाणून घेऊया त्यांचा करियर प्रवास.

घर चालवण्यासाठी पेन विकायचे जॉनी लीवर

कोट्यावधी चाहत्यांचं मन जिंकणाऱ्या या अभिनेत्याचा करियर प्रवास सोपा नव्हता. जॉनी लीवर यांना दोन भाऊ आणि तीन बहिणी आहेत. सगळ्या भावंडांमध्ये जॉनी सगळ्यात मोठा होता. जॉनीची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती. त्यामुळे त्यांनी शिक्षण सोडत रस्त्यावर पेन विकत कुटुंबाला आर्थिक हातभार लावला. त्यांच्या कॉमेडी स्वभावाचा वापर ते पेन विकतानाही करायचे. बॉलीवुड सेलिब्रिटींप्रमाणे डांस करत ते पेन विकायचे आणि त्यांचे चांगली विक्री व्हायची.

वडीलांना ऑपरेशन थिएटरमध्ये सोडत केलं होतं शुट

जॉनी लीवर हे बॉलीवुडमधील असं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी त्यांच्या वाईट रडत्या काळातही लोकांना हसवलं आहे. त्यांच्या दु:खाच्या क्षणी त्यांनी हसत काम केलंय. त्यांचे वडील आजारी असताना त्यांना हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये सोडून ते शुटसाठी गेले होते.

असं पडलं होतं त्यांचं नाव जॉनी लीवर

लीवर यांचं खरं नाव जॉन प्रकाश राव जनुमाला आहे. जेव्हा जॉनी यांनी शिक्षण सोडत पेन विकण्यास सुरूवात केली होती तेव्हा त्यांच्या वडीलांनी त्यांना हिंदूस्तान लीवर कंपनीत नोकरी लावून दिली होती. जॉनी तिथेही त्यांच्या कॉमेडीने मित्रांना हसवत होते. आणि इथेच त्यांचं नाव जॉनी लीवर असं पडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूरमध्ये मोठा ट्विस्ट! काँग्रेसने तिकीट दिल्यानंतर महिला उमेदवारांचा MIM मध्ये प्रवेश, काय दिलं कारण?

SA20: बापरे... क्रिकेट चाहत्याने पकडला तब्बल १.०८ कोटींचा कॅच! T20 सामन्यातील Video होतोय व्हायरल

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या सुनेला अटक, दीड कोटीची खंडणी घेताना रंगेहात पकडलं

Latest Marathi News Live Update : बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचारांच्या निषेधार्थ वाशिममध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे निदर्शनं

Jagannath Patil: कॅमेरा बंद कर, नाही तर फेकून देईल, भाजपाचे माजी मंत्री पत्रकारांवर संतापले

SCROLL FOR NEXT