Johnny Lever made an important decision with daughter Jamie lever to give comedy a bright future  SAKAL
मनोरंजन

Johnny Lever: कॉमेडीला उज्वल भविष्य देण्यासाठी जॉनी लिव्हर यांनी लेक जेमीसोबत घेतला महत्वाचा निर्णय

मराठी टेलिव्हिजन वर जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर बाप लेकीची जोडी पहिल्यांदा एकत्र येणार आहेत

Devendra Jadhav

Johnny Lever News: जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य.

या आठवड्यात मराठी टेलिव्हिजन वर जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर बाप लेकीची जोडी पहिल्यांदा एकत्र येणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’मध्ये मिमीकरी आर्टिस्ट असोसिएशन मुंबई साठी खेळणार आहेत.

ते स्वतः मिमीकरी आर्टिस्ट असोसिएशन मुंबई चे अध्यक्ष आहेत. कॉमेडी च्या भविष्यासाठी ते 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत.

(Johnny Lever made an important decision with daughter Jamie lever to give comedy a bright future)

'कोण होणार करोडपती' च्या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. बाप लेकीची हि जोडी पहिल्यांदाच मराठी टेलिव्हिजन वर एकत्र येणार आहेत.

त्यांच्यासोबत व्ही आय पी, नवीन प्रभाकर, नितीन भांडारकर आणि दिवेश शिवणकर हे विनोदी कलाकार देखील यावेळी कोण होणार करोडपती च्या मंचावर येणार आहेत.

या विनोदवीरांच्या येण्याने कोण होणार करोडपती च्या मंचावर हास्याचे तुफान येणार आहे. त्याव्यतिरिक्त जॉनी लिव्हर यांच्या येण्याने एक वेगळीच एनर्जी पाहायला मिळणार आहे.

जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर यांच्या सोबतच सचिन खेडेकर यांच्या विशेष गप्पा रंगल्या. नवीन प्रभाकर, व्ही आय पी, नितीन भांडारकर आणि दिवेश शिवणकर या कलाकारांचे विशेष परफॉर्मन्स कोण होणार करोडपतीच्या मंचावर पाहायला मिळणार आहेत.

जॉनी लिव्हर मंचावर असणार आणि धमाल होणार नाही हे शक्यच नाही. जॉनी लिव्हर यांनी त्यांच्या धमाल तुफानी कॉमेडी अंदाजात विनोद निर्मिती केली. त्यांच्या ह्या पेर्फोमन्स वर सचिन खेडेकर आणि सगळेच प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्यांचा हा पेर्फोमन्स पाहण्याजोगा आहे.

जेमी लिव्हर हिने देखील तिच्या अभिनयाची सुंदर अशी झलक दाखवली. तिने चक्क आशा भोसलेंच्या सुरेल आवाजाची नक्कल केली. सचिन खेडेकरांसोबत सगळेच प्रेक्षक थक्क झाले इतका हुबेहूब आवाज तिने काढला.

त्याव्यतिरिक्त तिने सांगितले कि जॉनी लिव्हर यांच्या व्यक्तिरेखांतील बाझीगर चित्रपटातील बाबुलाल हि व्यक्तिरेखा तिच्या सगळ्यात आवडीची आहे.

त्याची देखील हुबेहूब नक्कल तिने सादर केली. नवीन प्रभाकर, व्ही आय पी, नितीन भांडारकर आणि दिवेश शिवणकर यांनी देखील आपली कला या मंचावर सादर केली. या खेळातून जिंकलेली रक्कम जॉनी लिव्हर आणि जेमी मिमीकरी आर्टिस्ट असोसिएशन मुंबई यांना देणार आहेत.

विनोदाचे किंग जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर यांचा सहभाग असलेला 'कोण होणार करोडपती'चा हा विशेष भाग ८ जुलै रोजी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल. जिंकलेली रक्कम ते मिमीकरी आर्टिस्ट असोसिएशन मुंबई यांना देणार आहेत.

आता मिमीकरी आर्टिस्ट असोसिएशन मुंबई साठी खेळताना 'कोण होणार करोडपती'च्या खेळात ते किती रक्कत जिंकतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. 'कोण होणार करोडपती' चा विशेष भाग, ८ जुलै, शनिवारी रात्री ९ वाजता, सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update: पुण्यातील सर्व पेट्रोल पंप सुरू राहणार

Kolhapur News: ‘डीपी प्लॅन’, रिंगरोडला मिळेना मुहूर्त; गुंठेवारी नियमिती करणाचे घोंगडे अजूनही भिजतच

Toilet Hygiene Tips for Women: UTI थांबवण्याची सर्वात सोपी पद्धत; महिलांनी न चुकता फॉलो केल्या पाहिजेत 'या' हायजिन टिप्स

SCROLL FOR NEXT