jr ntr devara teaser out now saif ali khan janvhavi kapoor release date  SAKAL
मनोरंजन

Devara Teaser: रक्तात मिसळलेला 'लाल समुद्र' अन् तो... Jr. NTR च्या देवराचा थरारक टीझर बघाच!

ज्यु. एनटीआरच्या 'देवरा'चा थरारक टीझर रिलीज

Devendra Jadhav

Devara Teaser News: ज्यु. एनटीआरची प्रमुख भूमिका असलेला 'देवरा' सिनेमाची सर्वांची उत्सुकता आहे. ज्यु. एनटीआर या सिनेमात समुद्री खलाश्याची भूमिका साकारणार आहे. सिनेमाच्या पोस्टरपासूनच सिनेमाची उत्कंठा शिगेला आहे.

अशातच देवराचा थरारक टिझर रिलीज झालाय. या टीझरमध्ये ज्यु. एनटीआरचा खुनशी अवतार पाहायला मिळतोय.

देवराचा थरारक टीझर

देवराच्या 1 मिनिट 20 सेकंदाच्या टीझरमध्ये मुसळधार पावसाळी रात्री जहाजाजवळ येणा-या बोटींचा ताफा दिसतो. या बोटींवर असलेल्या दोरीच्या साहाय्याने काही लोकं जहाजावर चढण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि बोटींवर सीलबंद बॉक्स टाकताना दिसतात.

पुढे किनाऱ्यावर झालेल्या रक्तपातामध्ये, ज्युनियर एनटीआरची झलक दिसते. तो लोकांना तलवारीने आणि कुऱ्हाडीने मारताना दिसतोय. याशिवाय टीझरच्या शेवटी ज्युनियर एनटीआर पाण्यात रक्ताचे पाय धुताना दिसतो. समुद्राचे पाणी रक्ताने लाल झालेले दिसते. (Thrilling teaser of Devara)

टीझरच्या पार्श्वभूमीत एक गाणे वाजत आहे, जे लोकांना समुद्रापासून दूर राहण्याचा इशारा देते, ज्याला 'लाल सागर' म्हटले जात आहे. कारण त्यात माशांपेक्षा रक्त आणि तलवारी जास्त आहेत.

'देवरा'मध्ये जान्हवी कपूर आणि सैफ अली खानही आहे. पण ते मात्र अजून टीझरमध्ये दिसले नाहीत. सिनेमाचे दिग्दर्शन कोरतला सिवा यांनी केले असून संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे. आर रथनावेलू या चित्रपटाचे छायाचित्रकार आहेत.

'देवरा' दोन भागात प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग ५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची अधिकृत रिलीज डेट अद्याप समोर आली नाहीय.

या सिनेमात ज्यु. एनटीआर सोबतच जान्हवी कपूर, सैफ अली खान हे बॉलिवूड सुपरस्टार कलाकार सुद्धा झळकणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: सोन्यातील गुंतवणुकीसाठी सरकारची नवी योजना; घरात ठेवलेल्या सोन्यावर मिळणार व्याज, काय आहे स्कीम?

Pandharpur Shegaon Railway : पंढरपूर–शेगाव रेल्वे मार्गासाठी प्रयत्नांना बळ; पुण्यात DRM यांच्याशी सविस्तर चर्चा

Marathi News Live Updates : राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने अंकित श्रीवास्तव यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

Pune News: सिंहगडावर प्रवेशाची नवी पद्धत! ॲपद्वारे पूर्वनोंदणी, गर्दी वाढल्यास प्रवेश बंद, वन विभागाचा मोठा निर्णय

ICC Test Rankings: बुमराह खेळत नसूनही अव्वल, तर ट्रॅव्हिस हेडनं गमावलं पहिल्या क्रमांकाचं सिंहासन! आता कोण झालं 'नंबर वन'?

SCROLL FOR NEXT