When Aamir Khan Gave Cheap Gift To Juhi Chawla  esakal
मनोरंजन

Juhi Chawla : 'आमिर इतकं 'चीप' गिफ्ट देऊ शकतो असं कधीच वाटलं नव्हतं'! जुहीनं काय बोलून गेली?

'I never thought that Aamir could give such a 'cheap' gift'! What did Juhi say? आता जुहीनं आमिरच्या स्वस्तातल्या गिफ्ट देण्याविषयी सांगितलं आहे त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

युगंधर ताजणे , युगंधर ताजणे

When Aamir Khan Gave Cheap Gift To Juhi Chawla : प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी सेलिब्रेटी आहे. जुहीचा परखड अंदाज हा अनेकदा तिला वादाच्या भोवऱ्यात घेऊन जातो. आता जुहीनं आमिरच्या स्वस्तातल्या गिफ्ट देण्याविषयी सांगितलं आहे त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

जुही ही सध्या डान्स रियालिटी शो झलक दिखला जा ११ व्या सीझनमध्ये आली होती. हा एपिसोड जुही स्पेशल होता. यावेळी स्पर्धकांनी जुहीच्या गाण्यावर परफॉर्मन्स दिले. त्यात जुहीनं तिच्या बॉलीवूडमधील काही आठवणींना उजाळा दिला.

आमिर आणि अजय करायचे प्रँक...

यावेळी जुहीनं आमिर आणि अजयच्या त्या प्रँकविषयी देखील काही किस्से शेयर केले. ती म्हणजे आमिर आणि अजय हे दोघेही सेटवर सर्वाधिक खट्याळपणा करणारे अभिनेते आहे. या तिघांनी इश्क नावाच्या चित्रपटात एकत्र काम केले होते. तो चित्रपट लोकप्रिय झाला होता. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. इश्कच्या सेटवर अजय आणि आमिरनं अनेक प्रँक केल्याचे जुहीनं त्या मुलाखतीत सांगितले.

इश्कच्या सेटवर एक नवीन असिस्टंट दिग्दर्शक आला होता. तो जेव्हा क्लॅप करायचा तेव्हा आमिर आणि अजय त्याला छे़डायचे. त्यामुळे तो बोर्ड हालायचा आणि दिग्दर्शक वैतागयचे. पण त्यांना हे माहिती नव्हतं की हे कोण करतं म्हणून...

काय गिफ्ट दिलं आमिरनं...

त्या शो मध्ये फराह जुहीला विचारते की, इंडस्ट्रीत तुला कुणी सगळ्यात स्वस्तातले गिफ्ट दिले आहे का, त्यावर जुहीनं आमिरचे नाव घेतले. ती म्हणाली, मला आमिर खाननं असं स्वस्तातलं गिफ्ट दिलं होतं. त्यावेळी आम्ही नुकतेच स्टार्स झालो होतो. माझा बर्थ डे होता आणि आमिरचा मला फोन आला की, आम्ही घरी येत आहोत. त्यानं घरी येऊन मला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि मला एक चॉकलेट देत म्हणाला की हे माझ्याकडून खास गिफ्ट.

आमिर-जुहीनं कोणत्या चित्रपटात केलं काम?

आमिर आणि जुहीनं अनेक चित्रपटांसोबत एकत्र स्क्रिन शेयर केलं आहे. १९८४ मध्ये मिस इंडियाचा खिताब आपल्या नावावर केल्यानंतर तिनं सल्तनत नावाची फिल्म केली होती. त्यानंतर तिनं आणि आमिरनं कयामत से कयामत तक नावाची फिल्म केली. त्यातून जुहीच्या नावाची लोकप्रियता वाढली. तसेच आमिर आणि जुही हम है राही प्यार के, दौलत की जंग, लव लव लव आणि इश्क सारख्या चित्रपटांतून काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT