juhi
juhi 
मनोरंजन

जुहीची शेतकऱ्यांना मदत, शेतकऱ्यांना दिली स्वतःची जमीन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढता संसर्ग पाहता त्याचा सामना करण्यासाठी नामवंत चेहरे समोर येत आहेत. एकूणच सरकारला मदत करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करत आहेत. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी अनेक कलाकार पुढे आले आहेत. यामध्ये कोणी आर्थिक मदत करत आहे तर कोणी अन्न-धान्य आणि खाद्यपदार्थांची मदत करत आहेत. याशिवाय काहींनी आपले हॉटेल्स, ऑफिस डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून दिले आहे. या यादीमध्ये आता अभिनेत्री जुही चावलाचेही नाव जोडले गेले आहे. ती या काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी तिने तिची जमीन दिली आहे. 

जुहीची मुंबईच्या बाहेर एक जमीन आहे. त्या जमिनीत ऑरगॅनिक शेतीचे काम केले जाते. जिथे काही एक्सपर्ट या ऑरगॅनिक शेतीचे काम पाहतात. जुहीने आता ही जमीन शेतकऱ्यांना देऊ केली आहे. ही जमीन त्या शेतकऱ्यांना दिली आहे ज्यांच्याकडे शेती करायला जमीन नाही. तिने त्यांना ही जमीन मदत म्हणून दिली आहे, जेणेकरून शेतकरी या काळात या जमिनीत तांदळाची शेती करू शकतील. 

जुही म्हणाली की, 'सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने अशा शेतकऱ्यांना जमीन देण्याचा निर्णय मी घेतला आहे. ज्यांच्याकडे शेती करण्यास जमीन नाही. त्यांना मदत म्हणून ही जमीन देण्यात आली आहे. या जमिनीत तांदळाची शेती केली जाईल. आपल्या शेतकऱ्यांना जमीन, माती, हवा यांची समज शहरात राहणाऱ्या लोकांपेक्षा कदाचित जास्त आहे.

हे आपल्या सगळ्यांसाठी फायदेशीर आहे. आपण सर्वांनी असच हुशारीने काम करायला पाहिजे.' ही शेती ऑरगॅनिक पद्धतीने केली जाणार आहे आणि जुहीने तिच्या एक्सपर्टर्सला या शेतीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. कोणत्याही केमिकलचा ही शेती करताना वापर केला जाणार नाही यासाठी जुही स्वतः यामध्ये लक्ष घालत आहे. शेतकऱ्यांसाठी ही मदत करून खूप आनंदी आहे. जुही बॉलिवूडपासून कित्येक वर्षांपासून लांबच आहे. अभिनयाबरोबरच ती पर्यावरणासाठी देखील काम करते. मुंबई बाहेरील असलेल्या जमिनीची पाहणी करायला नेहमी जात असते.

juhi chawla has come forward to help landless farmers during the ongoing lockdown

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT