juhi 
मनोरंजन

lockdown:अभिनेत्री जुही परमार कडून शिका घरबसल्या नैसर्गिक साबण कसा बनवायचा?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- सध्या लॉकडाऊनमध्ये अनेक सेलिब्रिटी घरातील वेगवेगळी कामं करताना दिसून येत आहेत..लॉकडाऊन दरम्यान ते करत असलेल्या गोष्टी सोशल मिडीयावर देखील शेेअर करत आहेत..घरात मास्क आणि सॅनिटायजर कसं बनवाल हे प्रेक्षकांना सांगितल्या नंतर आता अभिनेत्री जुही परमार तिच्या युट्युब चॅनेलवर एक नवा व्हिडिओ घेऊन आली आहे..आणि यावेळी ती घरातल्या घरात ऑरगॅनिक साबण कसा बनवाल याबात टिप्स देताना दिसतेय..

जुहीने इंस्टाग्रामवर लिहिलंय, 'आज कोविड-१९च्या या संकटात स्वच्छता ठेवणं जास्त महत्वाचं आहे..स्वच्छतेमध्ये येत असलेले हे साबण आणि सॅनिटायजर मिळवण्यासाठी
सध्या खुपंच मेहनत घ्यावी लागत आहे..साबण आणि सॅनिटायजरने हात धुण्यासाठी सतत सांगितलं जातं आहे जे आपल्याला किटाणूंपासून  दूर ठेवतील..आणि म्हणूनंच मी आता इथे तुळशीच्या पानांपासून केमिकल व्यतिरिक्त नैसर्गिक असा साबण बनवत आहे..याचे खूप सारे फायदे आहेत.हा साबण पिंपल्स, त्वचेवरिल काळे डाग दूर करण्यासाठी आणि त्वचा मुलायम करण्यासाठी मदत करतो...इतकंच नाही
तर स्ट्रेच मार्क घालवण्यासाठीही हा उपयोगी आहे..या साबण तुम्ही घरच्या घरी बनवा. चला तर मग मी तुम्हाला सांगते की हा साबण कसा बनवाल?'

जुहीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे..तिचा हा व्हिडिओ  प्रेक्षकांना पसंत पडत आहे..तिचा हा व्हिडिओ आत्तापर्यंत ८७ हजार लोकांनी पाहिला आहे..जुहीने इंस्टाग्रामवर तिच्या पोस्टमध्ये या व्हिडिओची लिंक शेअर केली
आहे..यासोबतंच या पोस्टमध्ये जुहीने हातात बनवलेला साबण घेऊन तिचा फोटो सुद्धा पोस्ट केलाय..

जुहीच्या व्हिडिओंविषयी सांगायचं झालं तर तिचं स्वतःचं युट्युब चॅनेल आहे..या चॅनेलद्वारे ती हेल्थ, ब्युटी, वजन कमी करण्याच्या टीप्सवर व्हिडिओ शेअर करत असते..आत्तापर्यंत
तिने बनवलेले व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत आणि प्रेक्षकांनाही हे व्हिडिओ आवडत असल्याचं दिसून आलं आहे..

juhi parmar teaches fans to make homemade soaps video viral  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

Pune Flyover Work Stalled: कोरेगाव मूळ रेल्वे गेट क्र. ८ वरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम भूसंपादन मोबदला न मिळाल्याने पुन्हा ठप्प

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT