jui gadkar's tharla tar mag serial first rank in trp race knew the marathi serial trp rating latest update
jui gadkar's tharla tar mag serial first rank in trp race knew the marathi serial trp rating latest update sakal
मनोरंजन

Marathi Serial TRP: जुई गडकरीनं केली जादू! दीपा- अरूंधतीला मागे टाकत 'ठरलं तर मग' पहिल्या क्रमांकावर

नीलेश अडसूळ

Marathi Serial TRP: ओटीटीचे प्रस्थ कितीही वाढले तरी मालिकांची जादू काही कमी झालेली नाही. आजही चांदया पासून बांदयापर्यंत घराघरात मालिका पाहत जातात. सध्या मराठीमध्ये पाच वाहिन्या आणि पंचवीस हून अधिक मालिका असल्याने कोणती मालिका 'टीआरपी'च्या रेस मध्ये सर्वात वर आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.

गेली काही महीने 'स्टार प्रवाह' वाहिनी यामध्ये सर्वात पुढे आहे तर गेली काही दिवस याच वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' आणि 'आई कुठे काय करते' या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत बराच ववेळ बाजी मारली. पण गेले काही आठवडे चित्र पूर्ण बदलले आहे. अभिनेत्री जुई गडकरीची 'ठरलं तर मग' ही मालिका सलग तिसऱ्या आठवड्यात सर्वाधिक टीआरपी मिळवणारी मालिका ठरली आहे.

(jui gadkar's tharla tar mag serial first rank in trp race knew the marathi serial trp rating latest update)

तसं पाहायला गेलं तर यंदा कथाबाह्य कार्यक्रम अव्वल स्थानी आहे. स्टार प्रवाह वहिनीचा ''स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा 2023'' हा पहिल्या क्रमांकार असून त्याला 7.1 इतकी रेटिंग मिळाली आहे. तर मालिकांमध्ये 'ठरलं तर मग' ही मालिका पहिल्या क्रमांकावर असून या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे. 

'आई कुठे काय करते' ही मालिका दुसऱ्या तर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. तर आजवर पहिल्या क्रमांकावर हुकूमत गाजवणारी 'रंग माझा वेगळा' ही मालिका चौथ्या स्थानावर गेली आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.

'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका पाचव्या स्थानावर आहे. तर 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे पहिल्या दहा स्थानावर स्टार प्रवाह वाहिनीच्याच मालिका असल्याने ही वाहिनी यंदाही सर्वाधिक टीआरपी मिळवणारी वाहिनी ठरली आहे.

तर विनोदी कार्यक्रमांमध्ये 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाला 2.8 रेटिंग मिळाले आहे. तर सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाला केवळ 1.0 रेटिंग मिळाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT