Junior NTR Latest News Junior NTR Latest News
मनोरंजन

Oscar Predictions : ज्युनिअर एनटीआर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणार?

ज्युनिअर एनटीआरला हॉलिवूडच्या टॉप स्टार्ससह पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत

सकाळ डिजिटल टीम

Junior NTR Latest News वर्ष २०२२ चे ७ महिने उलटून गेले आहेत. फक्त काही चित्रपटच ब्लॉकबस्टर ठरले आहेत. दक्षिणेतील आरआरआरने (RRR) बॉक्स ऑफिसवर लोकांची मने जिंकली आहे. आता असे दिसते आहे की, आरआरआर अकादमी पुरस्कारांमध्येही यशाचा झेंडा फडकवणार आहे. हे आम्ही का म्हणत आहोत, तुम्हाला सांगतो.

आरआरआरला पाश्चिमात्य प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले आहे. या चित्रपटाच्या यशाचा मोठा पुरावा पॉप्युलर व्हरायटी मॅगझिनच्या अहवालातून मिळतो. मासिकाने आपल्या ऑस्कर अंदाज (Oscar Predictions) यादीमध्ये सर्व स्पर्धक आणि सर्वोत्कृष्ट चित्र श्रेणींमध्ये आरआरआरचा समावेश केला आहे. मासिकाने ज्युनिअर एनटीआरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत स्थान दिले आहे.

आरआरआरमधील (RRR) लीड स्टार्स ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण आहे. दोन्ही कलाकारांनी चांगले काम केले आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक हजार कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. व्हरायटी मॅगझिनच्या ऑस्कर प्रेडिक्शन लिस्टमध्ये ज्युनिअर एनटीआरचे नाव पाहून लोकांच्या आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ज्युनिअर एनटीआरला हॉलिवूडच्या टॉप स्टार्ससह पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चाहत्यांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. याबद्दल चाहते राजामौली यांचे आभार मानत आहे. आरआरआर २५ मार्च रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगण यांची छोटी भूमिका होती. हा चित्रपट स्वातंत्र्यपूर्व काळावर होता.

चित्रपटात रामचरणने अल्लुरी सीताराम राजूची भूमिका केली होती. तर ज्युनिअर एनटीआरने कोमाराम भीमची भूमिका केली होती. बाहुबलीसारख्या चित्रपटांच्या यशानंतर राजामौली यांनी आरआरआर दिग्दर्शित केले. या सिनेमानेही यशाचा झेंडा रोवला. परदेशी दिग्दर्शकांनाही राजामौली यांचा चित्रपट आवडला आहे. हॉलीवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार २०२२ मध्ये आरआरआरला दोनदा सन्मानित करण्यात आले. अशा परिस्थितीत हा चित्रपट ऑस्कर जिंकण्याची दाट शक्यता आहे. आता हा अंदाज कितपत खरा ठरतो, हे येणारा काळच सांगेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup: नऊ चिमुकल्यांचा मृत्यू पण एकही पोस्टमार्टेम का नाही? कफ सीरप प्रकरणात धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?

Shakti Cyclone: चक्रीवादळ ‘शक्ती’चा तडाखा बसणार! नेमकं काय आहे हे आणि किती घातक असेल? याचं नाव कुणी ठेवलं? वाचा...

IND vs AUS Full Schedule: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक ! वाचा कधी, कुठे, केव्हा खेळणार; वेळ व Live Telecast

Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना दसऱ्यालाच मिळालं दिवळीचं सुपर गिफ्ट; CM यादवांनी शेतकऱ्यांना दिले 653.34 कोटी

मोठी बातमी : भारतीय संघात राहायचा असेल तर... Rohit Sharma, विराट कोहली यांच्यासमोर अजित आगरकरने ठेवली अट

SCROLL FOR NEXT