kaala paani trailer ashutosh govarikar amey wagh mona singh chinmay mandlekar SAKAL
मनोरंजन

Kaala Paani Trailer: स्वतःला वाचवायचं की कुटुंंबाला? आशुतोष, अमेय, चिन्मयचा काला पानीचा अंगावर काटा आणणारा थरारक ट्रेलर बघा

आशुतोष गोवारीकर - अमेय वाघच्या काला पानी सिनेमाचा थरारक ट्रेलर भेटीला आलाय

Devendra Jadhav

Kaala Paani Trailer News: सध्या बॉलिवूडमध्ये अनेक नवनवीन विषयांवरचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यापैकी अनेक दर्जेदार सिनेमे OTT वर रिलीज होत आहेत. यातलाच एक सिनेमा म्हणजे काला पानी.

काला पानी सिनेमाचा रहस्यमय टीझर काही दिवसांपूर्वी भेटीला आला. या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता चाळवली. अशातच काला पानीचा ट्रेलर नुकताच भेटीला आलाय. हा थरारक ट्रेलर पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

(kaala paani trailer ashutosh govarikar amey wagh)

काला पानीच्या ट्रेलरमध्ये काय?

काला पानीच्या ट्रेलरमध्ये, एक रहस्यमयी कथा उलगडते. आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि अद्वितीय जैवविविधतेसाठी अंदमान आणि निकोबार बेटे ओळखली जातात. या बेटाला एका गूढ आजाराने ग्रासले आहे. याशिवाय तेथील नागरिकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. यावेळी त्यांना जास्त अडचण देतोय तो पसरलेला विशाल समुद्र.

अंदमान - निकोबार मध्ये अडकलेल्या माणसांना मदत करायला एक टीम सज्ज असते. मग बेटावर अडकलेली माणसं या संकटाचा सामना कसा करणार? जगणार की वाचणार? अशा अनेक गोष्टी काला पानीच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात.

हिंदी वेबसिरीजमध्ये मराठी कलाकारांची तगडी स्टारकास्ट

काला पानी या हिंदी वेबसिरीजमध्ये मराठी कलाकारांची तगडी स्टारकास्ट दिसून येते. वेबसिरीजमध्ये आशुतोष गोवारीकर प्रमुख भुमिकेत दिसतात. याशिवाय अमेय वाघ, चिन्मय मांडलेकर असे मराठी कलाकार उत्कृष्ट अभिनय करताना पाहायला मिळतात.

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मोना सिंग सिनेमात झळकतेय. समीर सक्सेना दिग्दर्शित काला पानी ट्रेलरमध्ये कसलेल्या कलाकारांची फौज दिसतेय.

काला पानीची रिलीड डेट काय?

काला पानी ही वेब सिरीज 18 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्स या ott प्लॅटफॉर्मवर ही वेबसिरीज पाहायला मिळणार आहे. समीर सक्सेना आणि अमित गोलानी या दोघांनी मिळून या वेबसिरीजचं दिग्दर्शन केलंय. बिस्वपती सरकारने ही वेबसिरीज लिहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cheteshwar Pujara Retire: भारताचा 'टेस्ट स्पेशालिस्ट' निवृत्त! पुजाराने केली मोठी घोषणा; म्हणाला, 'प्रत्येक चांगली गोष्ट...'

Latest Marathi News Updates : सांगोला तालुक्यात लांडग्यांचा कहर!

'जर कोणी माझ्यासाठी या दोन गोष्टी केल्या, तर मी आयुष्यात कधीच दक्षिणा घेणार नाही'; बागेश्वर बाबांचे मोठे विधान

Viral Video : महिलेने वाचविलेला जीव, अनेक वर्षांनी दिसताच सिंहांनी मारली मिठी, हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

Thalapathy Vijay चा मेगा ब्लॉकबस्टर शो! Modi च्या सभेपेक्षा जास्त गर्दी, पडद्यावरून थेट मैदानात कसा आला?

SCROLL FOR NEXT