Kabali producer KP Chowdhary Rajinikanth's Kabali movie arrested in drag smuggling SAKAL
मनोरंजन

Kabali producer KP Chowdhary: रजनीकांतच्या कबाली सिनेमाच्या निर्मात्याला ड्रग तस्करीमध्ये झाली अटक

रजनीकांत यांच्या 'कबाली' या सुपरहिट चित्रपटाचे निर्माते केपी चौधरी ड्रग्ज प्रकरणात अडकले आहेत

सकाळ डिजिटल टीम

Kabali Producer Arrested In Drug Case: रजनीकांत यांच्या 'कबाली' या सुपरहिट चित्रपटाचे निर्माते केपी चौधरी ड्रग्ज प्रकरणात अडकले आहेत. हैदराबाद पोलिसांनी त्याच्याकडून अमली पदार्थ जप्त केले, आणि त्यांना अटक करण्यात केली.

केपी चौधरी हे हैदराबादमधील राजेंद्रनगरजवळील किस्मतपूर येथील त्यांच्या घराकडे निघाले असताना त्यांना विशेष तपास पथकाने पकडले.

(Kabali producer KP Chowdhary Rajinikanth's Kabali movie arrested in drag smuggling)

वृत्तानुसार, केपी चौधरीकडून पोलिसांना कोकेनच्या 90 गोण्या सापडल्या, ज्यांचे वजन 82.75 ग्रॅम असल्याचे सांगण्यात आले.

केपी चौधरीने गोव्यातून ड्रग्जच्या 100 गोण्या विकत आणल्याचा दावा केला जात आहे, मात्र पोलिसांनी 90 जप्त केल्या आहेत.

केपी आपल्या क्लायंटला ड्रग्ज पुरवण्यासाठी जात असताना पकडले गेले. या प्रकरणी केपी चौधरी यांची आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि इतर तपास यंत्रणांकडून चौकशी केली जाणार आहे.

2016 मध्ये इंडस्ट्रीत एंट्री घेतली

ड्रग्ज प्रकरणापूर्वीही केपी चौधरी वादात सापडले आहेत. एनआरआय चिगुरुपती जयराम यांच्या हत्येप्रकरणी केपी चौधरी यांचेही नाव पुढे आले आहे.

2016 मध्ये, केपीने चित्रपट उद्योगात प्रवेश केला आणि रजनीकांतचा सिनेमा कबालीच्या तेलुगु आवृत्तीची निर्मिती केली.

याशिवाय केपी चौधरी यांनी काही चित्रपटांमध्ये वितरक म्हणूनही काम केले. त्यापैकी एक सरदार गब्बर सिंग आणि दुसरा सीताम्मा वकितलो सिरिमल्ले चेट्टू. याशिवाय ते कन्नीटन या तमिळ चित्रपटाशीही जोडले गेले होते.

या चित्रपटांमधून त्यांना फारसा फायदा झाला नसला तरी. मीडिया रिपोर्ट्सनुसार केपी चौधरी यांचा गोव्यात क्लब आहे. चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेक स्टार्स त्यांच्या क्लबला भेट देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, चार जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT