Bhuvan Badyakar (kaccha Badam song singer) Google
मनोरंजन

'कच्चा बादाम' या प्रसिद्ध गाण्याचा गायक अपघातात जबर जखमी

कार शिकण्याचं प्रशिक्षण घेताना हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे.

प्रणाली मोरे

गायक भुवन बडायकर (Bhuvan Badyakar) याच्या 'कच्चा बादाम'(Kaccha Badam) या गाण्यानं अख्ख्या भारताला आपल्या तालावर नाचायला भाग पाडलं आहे. या प्रसिद्ध गायकाविषयी आलेली बातमी जरा मनाला चटका लावणारी आहे. बोललं जात आहे की सोमवारी रात्री उशिरा एका अपघातात आपला हा लाडका गायक जखमी झाला आहे. गायक भुवन हा एका सेकंड हॅंड कारवर गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घेताना अपघात झाल्याचं बोललं जात आहे. या अपघातात भुवनच्या छातीला तसेच शरीराच्या इतर अवयवांनाही जबर मार बसल्याचं बोललं जात आहे. या घटनेनंतर भुवनला पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील एका इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे. आज भुवन हा इंटरनेट स्टार आहे,सोशल मीडियावर त्याच्या 'कच्चा बादाम' गाण्याच्या रीलचा नुसता पाऊस पडताना आपण पाहत आहोत. त्यामुळे अर्थातच त्याच्या चाहत्यांनी त्याला झालेल्या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली आहे.

भुवन बडायकर पश्चिम बंगालमधील लक्ष्मीनारायण पुर पंचायतच्या 'कुरलजुरी' या गावचा रहिवाशी आहे. येथे तो आपली पत्नी आणि तीन मुलांसोबत राहत आहे. खरंतर भुवन हा आपल्या कुटुंबाला पोसण्यासाठी शेंगदाणे विकण्याचं काम करायचा. आणि त्याचवेळेला लोकांनी ते शेंगदाणे घेण्यासाठी आपल्याकडे यावं म्हणून तो 'कच्चा बादाम' हे गाणं गायचा. पण तेव्हा एका व्यक्तीन तो गाणं गातानाचा एक व्हिडीओ तयार केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर पुढे जे घडलं ते इतिहासच म्हणावा लागेल. या गाण्यावर रिमिक्सही बनवण्यात आलं आहे. जवळजवळ ८० लाखापेक्षा अधिक व्ह्युज या गाण्याला मिळाले आहेत.

रोज शेंगदाणे विकून भुवन दिवसाला २०० ते २५० रुपये कमवायचा. पण गाण्यामुळे प्रसिद्धी मिळाली अन् त्यानं शेंगदाणा विक्रीच्या आपल्या व्यवसायाला रामराम ठोकला. काही दिवसांपूर्वीच भुवनला एका म्युझिक कपंनीनं कॉंट्रॅक्ट साइन करत तीन लाख रुपयाचा चेक दिल्याची बातमी आहे. भुवनला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे पश्चिम बंगाल पोलिसांनी देखील त्याचा सन्मान केला आहे. या गाण्यामुळे अनेक मोठ्या कार्यक्रमातनं भुवनला गाण्याची संधी मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT