Kajal Aggarwal, Gautam Kitchlu blessed with baby boy Google
मनोरंजन

'सिंघम गर्ल' काजल अग्रवाल बनली आई; अभिनेत्रीला पुत्ररत्नाचा लाभ

काजल अग्रवालनं बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

प्रणाली मोरे

दाक्षिणात्य आणि बॉलीवूड सिनेमातनं काम केलेल्या काजल अग्रवालचं(Kajal Aggarwal) घर आता एका गोंडस बाळाच्या आवाजानं बहरणार आहे. अभिनेत्रीनं एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. पती गौतम किचलूसोबत अभिनेत्री आता आपलं आईपण एन्जॉय करण्यासाठी एकदम रेडी आहे. काजल अग्रवालने आपल्या प्रेग्नेंसीची माहिती सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली होती. आपल्या प्रेग्नेंसी काळात काजोलने खूप चांगल्या गोष्टीत आपला वेळ घालवला आहे. स्वतःला फिट ठेवत अभिनेत्रीनं योगा करण्याला जास्त प्राधान्य दिलं होतं. सोशल मीडियावर जशी काजल अग्रवालला मुलगा झाल्याची बातमी शेअर करण्यात आली तसं लगोलग तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली.

फेब्रुवारी महिन्यात काजल अग्रवालचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आप्तेष्टांच्या सान्निध्यात पार पडला होता. तिनं सोशल मीडियावर या सोहळ्याचे फोटो शेअर केले होते. या सोहळ्यात तिनं सुंदर बनारसी साडी नेसली होती. त्यावर मॅचिंग ब्लाऊज आणि ट्रेडिशनल ज्वेलरीचा साज तिला शोभून दिसत होता.

Kajal Aggarwal 'Godh Bharai' Photo

काजल अग्रालनं ३० ऑक्टोबर २०२० मध्ये अगदीच मोजक्या आप्तेष्ट-मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. गौतम आणि काजोलची ओळख त्यांच्या एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर मैत्री झाली आणि मग तिचं प्रेमात रुपांतर झालं. कोरोनाच्या काळात त्यांना एकमेकांच्या सोबतीचं महत्त्व अधिक कळलं आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. काजल सध्या सिने इंडस्ट्रीपासून दूर आहे. आता ती आपला पूर्ण वेळ बाळाला देणार आहे,त्यानंतर ती सिनेइंडस्ट्रीत काम करण्याचा विचार करेल. तिन मागे एका मुलाखतीत आपल्या भविष्यातील या प्लॅनिंगविषयी सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT