Kajol plays important role in Tanhaji movie 
मनोरंजन

Tanhaji : 'मैं आपको हारने नहीं दूंगी'; काजोल दिसणार मराठमोळ्या रूपात

सकाळ डिजिटल टीम

सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे फक्त 'तानाजी : द अनसंग वॉरियर'ची! गेले काही दिवस अजय देवगण, काजोल आणि तानाजीची टीम दररोज काही ना काही नवीन आणि हटके पोस्टर, टीझर, प्रोमो सोशल मीडियावर शेअर करतात. आजही काजोलने एक खास पोस्टर रिलीज केलंय अन् त्यात ती स्वतः आहे!

तानाजीमध्ये काजोलही एक महत्त्वाची भूमिका साकारतीय. ती नक्की या चित्रपटात काम करणार की नाही, यावर चर्चा सुरू असतानाच या पोस्टरमुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काजोल तानाजी मालुसरेंच्या पत्नीची म्हणजेच सावित्रीबाई मालुसरेंची भूमिका साकारत आहे. आजपर्यंत फक्त तानाजींच्याच पराक्रमाबाबत इतिहासात नोंद होती, मात्र सावित्रीबाई त्यांच्या पाठिशी कशा भक्कमपणे उभ्या राहिल्या हे 'तानाजी'मध्ये बघायला मिळेल. तसेच अजय-काजोल हे रिअल लाईफ कपल आता मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा झळकणार आहे. 

काजोल या पोस्टरमध्ये मराठमोळ्या रूपात दिसतीय. मोठं कुंकू, सुंदर नथ, कानात मोत्यांच्या कुड्या, गळ्यात मणीमंगणसूत्र आणि इतर दागिने व डोक्यावरून पदर अशा पारंपारिक वेशभूषेत काजोल दिसतीय. 'मै आपको हारने नहीं दूंगी' असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. तिच्या या रूपामुळे तानाजीची उत्सुकता आणखी वाढली आहे. नेटकऱ्यांनीही तिच्या या लूकचे कौतुक केले आहे.

काजोलने तानाजी, शिवाजी महाराज, जिजाबाई, औरंगजेब, उदयभानू यांचे पोस्टर रिलीज केले होते. सैफ अली खान उदयभानूच्या भूमिकेत दिसेल. संगीतकार अजय-अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. येत्या वर्षात 10 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित हेईल. तसेच उद्या (ता. 19) तानाजीचे ट्रेलर लॉन्च होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

Railway Ticket Booking: 'रेलवन' ॲपचा ‘डिजिटल’ गोंधळ! पैसे वजा होऊनही तिकीट गायब; अधिकाऱ्याकडे तक्रार केली पण...

अखेर 'त्या' शिक्षकावर गुन्हा दाखल; विद्यार्थिनीला मारहाण केल्याचं प्रकरण; 'सकाळ'ने घटना आणली होती समोर

Yavatmal Crime : जुन्या वादातून तरुणाचा खून; आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT