Kajol Trolls for unexpected break  esakal
मनोरंजन

Kajol Social media Trolled : 'तू आता आमच्या मनातून उतरली!'

यासगळ्यात काजोलनं सोशल मीडियावर जी पोस्ट केली आहे त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. सोशल मीडियापासून काजोलनं लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे.

युगंधर ताजणे

Kajol Trolls for unexpected break From Social Media : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल ही तिच्या हटक्या स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ काजोल ही बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं ओळखली गेली आहे. काही दिवसांपूर्वी काजोलनं सोशल मीडियावर एक गोष्ट शेयर केली. त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली आहे. Kajol Trolls for unexpected break

काजोल आणि तिचा पती बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण यांच्या वैयक्तिक नात्याविषयीच्या गोष्टी व्हायरल होत आहेत. काजोल भलेही आता काही निवडक चित्रपटांमध्ये दिसत असेल पण ती आता निर्माती म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. काजोल लस्ट स्टोरीजच्या दुसऱ्या भागात महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त असल्याचे दिसून आले आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

यासगळ्यात काजोलनं सोशल मीडियावर जी पोस्ट केली आहे त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. सोशल मीडियापासून काजोलनं लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे या माध्यमांमध्ये आपण जास्त काळ सक्रिय राहणार नसल्याचे तिनं सांगितलं आहे. काजोलच्या या निर्णयाचे काही नेटकऱ्यांनी स्वागत केले असले तरी अनेकांनी तिच्यावर तीव्र शब्दांत राग व्यक्त केला आहे. आता काजोल म्हणते की, माझ्या नव्या चित्रपटाच्या निमित्तानं काही गोष्टी सांगाव्या लागल्या.

त्यानंतर काजोलवर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. काजोल तू आता खूपच स्वस्तात तुझ्या चित्रपटांचे प्रमोशन करत आहे. हे काही बरे नाही. त्यामुळे ज्या प्रकारे सोशल मीडियाचा उपयोग करते आहे ते चूकीचे आहे. एकीकडे सांगते की, मी सोशल मीडियापासून ब्रेक घेते दुसरीकडे म्हणते हा चित्रपटाचा भाग आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता तुझ्याविषयीचा आमच्या मनातील आदर संपला. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

सोशल मीडियावर आता #ShameOnKajolHotstar असा ट्रेंड सुरु आहे. त्यानंतर तिनं सोशल मीडियाला आपण रामराम करत असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर तिनं तिच्या आगामी द ट्रायल नावाच्या सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे सांगितले आहे. काजोलची ही ट्रीक मात्र नेटकऱ्यांना ओळखायला वेळ लागलेला नाही. त्यामुळे त्यांनी तिला धारेवर धरलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

Pune Land Scam : निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा; १९ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण!

SCROLL FOR NEXT