New OTT releases this week esakal
मनोरंजन

New OTT releases : आजचा दिवस आहे खास, OTT वर प्रदर्शित होताहेत 6 चित्रपट!

ओटीटी लव्हर्स या चित्रपटांची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. वेगवेगळ्या विषयांवरील या कलाकृतींच्या टीझर, ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

युगंधर ताजणे

New OTT releases this week : टीव्ही मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आजचा दिवस हा ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी महत्वाचा ठरणार आहे. याचे कारण आजच्या दिवसाच्या निमित्तानं तब्बल सहा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे मेकर्सच्या वतीनं सांगण्यात आले आहे.

ओटीटी लव्हर्स या चित्रपटांची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. वेगवेगळ्या विषयांवरील या कलाकृतींच्या टीझर, ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. येत्या आठवड्यात बॉलीवूडमधील वेगवेगळ्या कलाकृती प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मनं गेल्या काही वर्षात मनोरंजन विश्वात महत्वाची भूमिका बजावली आहे. प्रेक्षक थिएटरमध्ये जाण्याऐवजी ओटीटीवरुन चित्रपटांचा आनंद घेत असल्याचे दिसून आले आहे.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

अशातच दिग्गज कलाकारांच्या कलाकृती ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. ओटीटीचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. कोरोनाच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मचे महत्व दिसून आले. लक्षावधी प्रेक्षकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मकडे धाव घेतली. पारंपरिक मनोरंजन व्यवस्थेला डावलून नवं माध्यम प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी ठरताना दिसत आहे. १४ जुलैच्या निमित्तानं कोणत्या नव्या कलाकृती प्रेक्षकांसमोर येणार आहेत याविषयी जाणून घेऊयात...

‘द ट्रायल: प्यार कानून धोखा’-

प्रसिद्ध अभिनेत्री काजोलच्या या वेबसीरिजची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे. ही मालिका अमेरिकन वेबसीरिज द गुड वाईफचे हिंदी व्हर्जन असून त्याच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये कुब्रा सैत, शीबा चढ्ढा, जिशू सेनगुप्ता यांच्यासारखे अनेक कलाकार दिसणार आहेत.

‘द समर आय टर्न्ड प्रिटी सीजन 2’ -

ही एक रोमँटिक वेब सीरिज असून त्यात वेगवेगळ्या प्रेमाच्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. प्रेम की आकर्षण यातील फरक मोठया खूबीनं यात मांडण्यात आला आहे. १४ जुलै रोजी ही सीरिज अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.

‘कोहरा’

सुविंदर विक्की, वरुण सोबती, मनीष चौधरी, हरलीन सेठी, वरुण बडोला आणि राचेल शेली यांची भूमिका असलेल्या कोहराच्या ट्रेलरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. ग्रामीण पंजाबमधील एक गोष्ट या मालिकेच्या निमित्तानं मांडण्यात आली आहे. सस्पेन्स आणि थ्रिलर या प्रकारातील मालिकेची मोठी चर्चा आहे.

हड्डी -

नवाझुद्दीन सिद्धिकीचा हड्डी नावाचा मुव्ही १५ जुलै रोजी प्रदर्शित होणार झी ५ वर हा चित्रपट येणार असून त्याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. त्याचे कारण नवाझुद्दीनचा त्यातील तृतीयपंथीय लूक, सोशल मीडियावर तो खूपच लोकप्रिय झाला होता. नवाझुद्दीन पहिल्यांदाच अशा प्रकारच्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार असल्यानं त्याच्या अभिनयाबाबत उत्सुकता आहे.

‘इश्क-ए-नादान’

ही वेबसीरिज आज प्रदर्शित होणार आहे. त्याची स्टोरी ही मुंबई या शहरावर आधारित आहे. भावनिक मुद्दयावर लक्ष केंद्रित करुन या कथेची बांधणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. इश्क ए नादान या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक घोष यांनी केले आङे. त्यामध्ये लारा दत्ता, मोहित रैना, श्रिया पिळगावकर आणि नीना गुप्ता यांच्या भूमिका आहेत.

लव टॅक्टिक्स २ -

ही एक रोमँटिक अंदाजातील कॉमेडी फिल्म आहे. जी नेटफ्लिक्सवरुन प्रदर्शित होणार आहे. लग्न या विषयावर वेगवेगळ्या प्रकारचे भाष्य या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आल्याचे मेकर्सच्या वतीनं सांगण्यात आले आहे. या चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखेला लग्नासाठी प्रवृत्त केले जाते.

टू हॉट टू हँडल -

सोशल मीडियावर या सीरिजची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते आहे. त्याच्या ट्रेलरला मिळालेला प्रतिसादही मोठा आहे. १४ जुलै रोजी नेटफ्लिक्सवरुन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोमांचक आणि तितकीच भावनिक स्वरुपाची ही मालिका असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway Traffic Jam : कोकणात जाणाऱ्यांची लगबग; मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लाब रांगा...

आता पोस्टमनही म्युच्युअल फंड विकणार! पोस्ट ऑफिस Mutual Funds चे नवे हब बनणार; ग्रामीण गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

जन्माष्टमीला बाळाला कृष्ण केलं, तीन दिवसांनी नदीत उडी; चौथ्या दिवशी पतीने बाळासह तिथंच घेतली जलसमाधी....

Ganesh Chaturthi 2025: भारतभर गाजणारा बाप्पांचा जल्लोष! जाणून घ्या विविध राज्यांतील खास गणेशोत्सवाच्या परंपरा

Latest Marathi News Updates : सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता झालेला तरुण अखेर सापडला

SCROLL FOR NEXT