Kajol trolled for being rude to paparazzi at the airport called She is the next Jaya Bachchan sakal
मनोरंजन

Kajol: तापसी पाठोपाठ काजोलचा नंबर; जया बच्चनच्या नावाने झाली ट्रोल.. कारण..

कलाकारांच्या त्या चुकीमुळे सध्या जया बच्चन यांच्या नावावरून कलाकारांना केलं जातंय ट्रोल..

नीलेश अडसूळ

kajol: कलाकारांच्या दैनंदिन हालचाली टिपण्यासाठी पापाराझी जीवाचे रान करत असतात. पण त्यांचा त्रास होत असल्याने कलाकार मात्र त्यांच्याशी अत्यंत उद्धटपणे वागत आहेत. आणि तसे करणाऱ्या कलाकारांना मात्र नेटकरी सरळ ट्रोल करत आहे. गेले किती दिवस जया बच्चन या बाबतीत ट्रेंड मध्ये होत्या नंतर तापसी पन्नू आणि आता काजोल.

(She is the next Jaya Bachchan, Kajol trolled for being rude to paparazzi at the airport)

काजोल बॉलीवूडमधील सर्वात आवडत्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. तिचा बडबडा स्वभाव तसेच तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. पण काजोलने पापाराझीला पोझ दिली नाही त्यामुळे काजोल ट्रोल झाली आहे.

काजोल आणि तिचा मुलगा विमानतळावर दिसले. दोघेही घाईघाईने गेटच्या दिशेने धावत होते आणि पापाराझीला इंगनोर करत होते. तिच्या अशा करण्यावरून असे वाटत होते की पापाराझाची उपस्थिती तिला आवडली नाही आणि ती चिडली. कॅमेर्‍यासमोर पोज देण्याची तिची इच्छा नव्हती. काजोलच्या अश्या वागण्याने नेटिझन्सने तिला ट्रोल केले आहे.

अनेकांनी तिला 'जया बच्चनची दुसरी आवृत्ती' म्हणून हिणवले आहे, तर एका व्यक्तीने असे लिहिले की 'बॉलीवूड स्टार्स अनेकदा त्यांचे फोटो क्लिक करण्यासाठी मीडियाला कॉल करतात आणि नंतर उद्धट पणे वागतात', तर एकाने लिहिलं आहे की, 'हिच्याबाबतीत असं काही घडलंच नाही तर हिला‌ काय झाले जया बच्चनसारखे करायला..'

इतकेच नव्हेतर यापूर्वी काजोलकडे लहान मुलांने पैसे मागितले आणि तिने दुर्लक्ष केले होते तेव्हापण ती ट्रोल झाली होती. तर काहींनी काजोलच्या सनग्लासेस घेऊन कमेंट दिल्या "रात्री सनग्लासेस कोण घालत का? या सनग्लासेस मध्ये कार्टून दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT