Kamal Haasan Birthday why american police caught kamal haasan during shooting SAKAL
मनोरंजन

Kamal Haasan Birthday: कमल हसन यांच्यावर अमेरिकन पोलिसांनी रोखलेली बंदूक, हे होतं कारण

कमल हसन अमेरिकेत असताना त्यांना धक्कादायक प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं

Devendra Jadhav

Kamal Haasan Birthday: कमल हसन यांचा आज वाढदिवस. कमल हसन यांनी आजवर अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कमल हसन यांच्या विविध भुमिका लोकांच्या मनात घर करुन आहेत.

कमल हसन यांनी स्वतःच्या सिनेमांमधून कायम नवनवीन प्रयोग केले. हे प्रयोग अनेकदा नावाजले गेले. पण कमल हसन यांच्या आयुष्यात एक अशी गोष्ट घडलेली जेव्हा चक्क अमेरिकन पोलिसांनी त्यांच्यावर बंदूक रोखलेली. काय होता तो किस्सा? जाणुन घ्या.

(Kamal Haasan Birthday why american police caught kamal haasan during shooting)

ही गोष्ट २०१३ सालची. कमल हसन विश्वरुपम सिनेमाचं शुटींग करत होते. यावेळी त्यांचा सहकलाकार होता सध्याचा आघाडीचा अभिनेता जयदीप अहलावत. जयदीपने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

कमल हसन विश्वरुपम सिनेमात एका ब्रीजवर कार चेसिंगचं शुटींग करत होते. त्यावेळी एक असा क्षण आला की, कमल हसन यांच्यावर अमेरिकन पोलिसांनी बंदूक रोखली होती.

विश्वरुपम सिनेमात एक प्रसंग असा होता की, कार चेसिंगचा सीन होता. त्यावेळी गाड्या दोन - तीनवेळा त्या ब्रीजवरुन एकमेकांचा पाठलाग करतात. अमेरिकेत त्यावेळी ख्रिसमसचे दिवस होते. त्यामुळे संपूर्ण भागात हाय अलर्ट जारी केले होते.

शुटींगच्या वेळी गाड्या जसा ब्रीजवर चढल्या तसं पोलिस अलर्ट झाले. त्यांनी कमल हसन यांची गाडी अडवली आणि त्यांच्यावर बंदुका रोखल्या

हॉलिवूड सिनेमांंमध्ये जसं गुन्हेगारांकडे बंदुका रोखल्या जातात. तसं नऊ - दहा पोलिस कमल हसन यांच्याकडे बंदूक रोखुन उभे होते. आता आपल्याला अटक होणार? असं सर्व कलाकारांना वाटलं. कमल हसन गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसले होते. पुढे त्यांनी शुटींगसाठी घेतलेल्या परवानगीची कागदपत्रं आणि इतर गोष्टी दाखवल्या. आणि पोलिसांची खात्री पटली की शुटींग सुरु आहे. आणि त्यांनी कमल हसन यांना जाऊ दिलं.

कमल हसन लवकरच इंडियन 2 मध्ये झळकणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : चंपत राय यांच्यासह इतर विश्वस्तांवर काय कारवाई केली जाणार आहे? - विजय वडेट्टीवार

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

Karnataka SIR Campaign : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक राहत होते कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड, 'त्या' कुटुंबाचं दुबई कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT