Kamal Haasan  
मनोरंजन

"..तर मी अभिनय सोडेन"; कमल हासन यांचा इशारा

स्वाती वेमूल

राजकीय प्रवासात जर अडथळा निर्माण होत असेल तर अभिनय सोडून देईन, असं विधान अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेले कमल हासन यांनी केलं. कोईंबतूरमध्ये ते पत्रकारांशी संवाद साधत होते. "सिनेमा हा माझा व्यवसाय आहे आणि मला इतरांवर अवलंबून राहायचं नाही म्हणून पैसे कमावण्यासाठी मी सिनेमांमध्ये काम करतो. त्यामुळे यापुढेही मी अभिनय करत राहीन. पण जर का अभिनय माझ्या राजकीय प्रवासात अडथळा निर्माण करणार असेल तर मग मी ते सोडून देईन", असं 'मक्कल निधी मय्यम' या पक्षाचे अध्यक्ष कमल हासन म्हणाले. यावेळी त्यांनी राजकारणात फार उशिरा प्रवेश केल्याविषयी खंत व्यक्त केली. त्याचप्रमाणे पुढील संपूर्ण आयुष्य हे जनतेच्या सेवेत घालवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

"सध्या ज्या चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे, ते पूर्ण करेन. भविष्यात आणखी चित्रपटांचे ऑफर्स स्वीकारायचे की नाहीत, याचा निर्णय नंतर घेईन. आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही एमजीआर यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. कारण त्यांना त्यांच्या राजकीय करिअरसाठी पैसा हवा होता. मलासुद्धा पैशांची गरज आहे, म्हणून मी अभिनयक्षेत्रात अजूनही काम करतोय. शक्य असल्यास, मी भविष्यात माझं मानधनही वाढवेन आणि मिळालेला पैसा मी जनतेच्या कामात वापरेन", असं ते म्हणाले.

तामिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कमल हासन कोईंबतूर दक्षिण या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार आहेत. त्यांनी शुक्रवारी आपला पक्ष मक्कल निधी मय्यमच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. तामिळनाडूमध्ये ६ एप्रिलपासून निवडणुका होणार आहेत. पहिल्यांदाच कमल हासन यांचा पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत त्यांचा पक्ष आघाडी करेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, रजनीकांत तब्येतीच्या कारणास्तव निवडणुका न लढण्याचा निर्णय घेतला. कमल हासन यांनी भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचं वचन दिलं आहे. तसंच महिलांसाठी त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

रशियातील लॅब टेक्निशियनच्या मृत्यूने खळबळ; न्यूमोनिक प्लेगची चर्चा, भारताची चिंता वाढली?

Sangli Mother Child Death : सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना! आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

SCROLL FOR NEXT