Kamya Punjabi leaves behind envelope with ₹1 lakh cash at pani puri stall in Indore Instagram
मनोरंजन

पाणीपुरीच्या गाडीवर काम्या पंजाबी विसरली एक लाख रुपये, लक्षात आलं तेव्हा...

अभिनेत्री काम्या पंजाबी सध्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं इंदौरमध्ये आहे.

प्रणाली मोरे

गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींना पाणीपुरी खाताना पाहिलं गेलं आहे. काही दिवस आधी रुबिना दिलैक आपल्या कुटुंबासोबत पाणीपुरी खाताना दिसली होती. 'लाल सिंग चड्ढा'च्या ट्रेलर रिलीजनंतर आमिर खान देखील पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिसला. काम्या पंजाबीचा(Kamya Punjabi) असाच पाणीपुरी खातानाचा फोटो व्हायरल झालेला दिसून आला आहे. काम्या एका पाणीपुरीच्या गाडीवर पाणीपुरी खात होती आणि तिथे ती चक्क एक लाख(One Lakh) रुपये विसरली.

काम्या पंजाबी सध्या इंदौरमध्ये आहे. तिथे एका पाणीपुरीच्या गाडीवर चक्क एक लाख रुपयांनी भरलेलं वजनदार पाकीट ती विसरली. एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना ती म्हणाली आहे,'' मी रविवारी एका कार्यक्रमा निमित्तानं इंदौरला गेली होती. तिथून मी जेव्हा परत येत होती तेव्हा माझ्या मॅनेजरने एका पाणीपुरीच्या दुकानाची खूप प्रशंसा केली. तसंही इंदौर चाटसाठी प्रसिद्ध आहे. मग मी पाणीपुरी खाण्याचा मोह आवरु शकले नाही. मी त्या दुकानावर पाणीपुरी खायला जाण्याचं ठरवलं. माझ्याकडे त्यावेळी एक लाख रुपये कॅश असलेलं एक पाकीटही होतं. मी ते पाकिट तिथल्या माझ्या टेबलवर ठेवलं. आणि पाणीपुरी खाऊ लागली''.

पण त्यावेळी मी पाणीपुरी खाण्यात आणि ती खाताना फोटो काढण्यात एवढी बिझी झाले की तिथून येताना मी ते पैशाचं पाकीट तिथेच विसरली. काम्याच्या म्हणण्याप्रमाणे ती जेव्हा हॉटेलवर पोहोचली तेव्हा तिला आठवलं की आपल्याजवळ पैशाचं पाकीट नाहीय. आणि ती ते पाणीपुरीच्या दुकानावर विसरुन आली. माझ्या मॅनेजरने तडक ते दुकान गाठलं आणि आमचं नशीब की आम्ही हॉटेलवरुन परत तिथे जाईपर्यंत ते पाकिट त्याच टेबलवर पडलेलं होतं. माझ्यासाठी तो सुखद धक्का होता. कारण मी ते पाकिट परत मिळण्याची अपेक्षा सोडली होती. पण देवाची कृपा म्हणावी लागेल. मला वाटत इंदौरचे लूक खरोखर खूप चांगले आहेत''. काम्या पंजाबी सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे पण अनेकदा कोणत्या ना कोणत्या वादात उडी मारुन ती चर्चेत येताना दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT