Kangana Ranaut allegedly reacts to report of Ranbir Kapoor playing Lord Ram in Ramayana SAKAL
मनोरंजन

Kangana Ranaut: हा तर हाडकुळा पांढरा उंदीर... रणबीरच्या श्रीराम अवतारावर कंगनाची सडकून टीका

रणबीरच्या या लूकवर अभिनेत्री कंगना रणौतने टीका केलीय

Devendra Jadhav

Kangana Ranaut on Ranbir Kapoor Playing Lord Shriram News: सध्या आदिपुरुष सिनेमाची चर्चा आहे. रामायणावर आधारित आदिपुरुष सिनेमा १६ जूनला प्रदर्शित होतोय. आता नितेश तिवारी यांनीही रामायण सिनेमाची घोषणा केलीय.

इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे.. या सिनेमात रणबीर कपूर श्रीरामाच्या भूमिकेत तर आलिया भट सीतेच्या भूमिकेत आहे. पण आता रणबीरच्या या लूकवर अभिनेत्री कंगना रणौतने टीका केलीय

(Kangana Ranaut allegedly reacts to report of Ranbir Kapoor playing Lord Ram in Ramayana)

कंगनाने लिहिले, "अलीकडेच रामायण येत असल्याची बातमी ऐकत आहे... जिथे एक हाडकुळा पांढरा उंदीर (तथाकथित अभिनेता) ज्याला थोड्या समजुतीची नितांत गरज आहे. तो जवळजवळ प्रत्येक व्यक्तीबद्दल वाईट प्रसिद्धी करण्यासाठी लोकप्रिय आहे.

अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेसाठी ओळखला जाणारा हा अभिनेता भगवान शिव ट्रायोलॉजीमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न केल्यानंतर

(ज्याला कोणीही पाहिले नाही किंवा त्याचे अधिक भाग बनवू इच्छित नाही) आता भगवान राम बनण्याची आवड वाढली आहे..." ईथे कंगनाने ब्रम्हास्त्र सिनेमाचा उल्लेख केलाय.

कंगना पुढे म्हणाली, "यासमोर एक तरुण साऊथ सुपरस्टार जो स्वत:च्या पायावर ईथवर आलाय, एक कौटुंबिक माणूस, एक परंपरावादी, जो वाल्मिकीजींच्या वर्णनानुसार तो त्याच्या वर्ण, वर्तन आणि चेहर्यावरील वैशिष्ट्यांमध्ये भगवान रामासारखा दिसतो...

पण त्याला रावणाची भुमिका मिळते... हे कसलं कलयुग आहे? फिकट दिसणारा ड्रग्ज घेणाऱ्या मुलाने भगवान रामाची भूमिका करू नये.... जय श्री राम (हात जोडलेले इमोजी)." अशा भावना व्यक्त करत कंगनाने रणबीरवर सडकुन टीका केलीय.

मिडीया रिपोर्ट्सनुसार, दंगल फेम सीतेच्या भूमिकेसाठी आलियाचे नाव निश्चित झाले आहे. तर रणबीर भगवान राम बनणार आहे. त्याची अधिकृत घोषणा यंदाच्या दिवाळीत होईल. त्याचवेळी रावणाच्या भूमिकेसाठी 'केजीएफ' स्टार यशचे नाव पुढे येत आहे.

काही महिन्यांपूर्वी अशी बातमी आली होती की रावणाच्या भूमिकेसाठी नितेश तिवारी आणि मधु मंतेना यशसोबत चर्चा करत आहेत. यश या चित्रपटासाठी तयार असून, त्याने रावणाच्या भूमिकेत रस दाखवल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना बंद होणार? 'या' बड्या नेत्याच्या दाव्याने महिलांमध्ये खळबळ

तुझे न्यूड फोटो पाठवशील का? अक्षय कुमारच्या १२ वर्षाच्या मुलीला आला घाणेरडा मेसेज; अभिनेत्याने सांगितलं नेमकं काय घडलं

Cough Syrup Deaths : 'कफ सिरप'ने घेतला 12 बालकांचा जीव, पाच मुले गंभीर; औषधात आढळला विषारी घटक, नागपूर प्रयोगशाळेत झाली महत्त्वाची चाचणी

Mumbai Political News : नवी मुंबईत भाजपचाच महापौर, कार्यकर्त्यांचा मान राखला जात नसेल तर युती होऊ नये : गणेश नाईक

ICC Women's World Cup : पाकिस्तानच्या पराभवाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली! आता एक चूक हरमनप्रीत कौरच्या संघाला पडू शकते महागात

SCROLL FOR NEXT