Kangana Ranaut Emergency actress Target Alia Bhatt esakal
मनोरंजन

Kangana On Alia Bhatt : 'तुला देशाच्या राष्ट्रपतींचे नाव माहिती नाही, तू म्हणजे....' कंगनानं शेलक्या शब्दांत आलियाचा घेतला समाचार

बॉलीवूडची पंगा गर्ल म्हणून कंगनाचे नाव घेतले जाते.

युगंधर ताजणे

Kangana Ranaut Emergency actress Target Alia Bhatt : बॉलीवूडची पंगा गर्ल म्हणून कंगनाचे नाव घेतले जाते. आपल्याला एखाद्याविषयी काही वाटल्यास ते बिनधास्तपणे बोलून मोकळे व्हायचे. आपण जे बोललो आहे त्याचे परिणाम किंवा पडसाद कसे उमटू शकतात याची पर्वा करायची नाही. असा स्वभाव कंगनाचा आहे. त्यामुळेच की काय ती नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहिली आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

बॉलीवूडमधील एक सेलिब्रेटी असा नसेल ज्याच्यासोबत कंगनानं पंगा घेतला नसेल. ज्येष्ठ पटकथाकार, गीतकार जावेद अख्तर यांच्यापासून आलिया भट्टपर्यत कंगनानं आपणच बॉलीवूडची क्वीन आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता तिनं ब्रम्हास्त्रची अभिनेत्री सध्याची हिट सेलिब्रेटी आलिया भट्टवर राग व्यक्त केला आहे. तिच्यावर तिनं दिलेली प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे.

Also Read - Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर

त्याचं झालं असं की, आलियाला २०१३ भारताचे राष्ट्रपती कोण आहेत हे सांगता आले नाही. त्याचा कंगनाला खूपच राग आला. तिनं आलियाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तिच्यावर आगपाखड केली आहे. कंगनाच्या फटकळपणाचा प्रत्यय यापूर्वी कित्येक बॉलीवूडच्या सेलिब्रेटींना आला आहे. त्यामुळे शक्यतो कंगनासोबत कुणी वाद घालण्याचा प्रयत्न करत नाही.

कंगनानं आता सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात तिनं आलियाचे नाव घेत तिला माहिती नसलेल्या गोष्टीविषयी जाहीरपणे भाष्य केले आहे. ती पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. आलियाला २०२३ मध्ये भारताचे राष्ट्रपती कोण होते हे माहिती नाही. करणच्या कॉफी विथ करण या शो मध्ये आलिया ही २०१३ मध्ये सहभागी झाली होती. त्यात करणनं तिला तो प्रश्न विचारला होता.

kangana tweet

आलियानं २०१३ मध्ये देशाचे राष्ट्रपती हे प्रणब मुखर्जी नसून पृथ्वीराज चव्हाण असल्याचे सांगितले होते. यावेळी कंगनानं एका ट्रोलर्सच्या प्रतिक्रियेचा आधार घेत आलियावर निशाणा साधला आहे. यापूर्वी देखील कंगनानं आलिया आणि रणबीरवर टीका केली आहे. तिनं त्यांच्या जोडीला नाटकी जोडी असे म्हटले होते. आता यासगळ्यावर आलिया काय प्रतिक्रिया देणार याकडे नेटकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT