Kangana ranaut  esakal
मनोरंजन

कंगनाची आणखी एका वादात उडी, लेखिकेला म्हणाली हिंदू विरोधी!

कंगना आणि वाद हे नवीन समीकरण तयार झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

आमिर खानचा 'लालसिंग चढ्ढा'च नव्हे तर अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन'ही सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आहे. 'लालसिंग चढ्ढा'वर बहिष्कार बायकाॅटवरुन हॅशटॅग ट्रेंड होत आहे. या प्रमाणेच बायकाॅट रक्षाबंधनही ट्रेंडिंगमध्ये होता. ट्विटरवर युजर्स चित्रपटाचा विरोध करत आहे. चित्रपटाची लेखिका कनिका ढिल्लनच्या जुन्या ट्विटवरुन वाद सुरु झाला आहे. कनिकाने 'गौमूत्रा'बाबत अगोदर ट्विट केले होते. त्याला यूजर्स हिंदू विरोधी असल्याचे सांगत आहेत. यात अभिनेत्री कंगना रणावतनेही (Kangana Ranaut) आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Kangana Ranaut Attack On Raksha Bandhan Writer Kanika Dhillon)

एका संकेतस्थळाने दावा केला होता की कनिकाने आपले अनेक जुने ट्विट डिलिट केले आहेत. कारण ते ट्विट हिंदू विरोधी होते. कंगनाने संकेतस्थळाच्या बातमीबरोबर आपले मत मांडले आणि रक्षाबंधनच्या लेखिकेवर निशाणा साधला. ती म्हणाली, की केवळ पैशामुळे तिने हिंदू विरोधी ट्विट डिलिट केले. (Bollywood News)

कंगना आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिते, हाहा, तिचे आर्थिक नुकसानीपेक्षा जास्त काही होत नाही. फक्त आर्थिक नुकसानीच्या भितीने तिने हिंदू फोबिया आणि भारत विरोधी ट्विट डिलिट करु शकते. आणि बाकी नाही. रक्षाबंधन (Raksha Bandhan) या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे. चित्रपटात अक्षय कुमारबरोबर (Akshay Kumar) भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी आमिर खानचा 'लालसिंग चढ्ढा'ही प्रदर्शित होत आहे. यात करिना कपूर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आज निघणार विनापरवाना दुचाकी रॅली! सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनीच नाकारला पोलिसांचा नियम; शांतता कमिटीचे सदस्यच आयोजक

Glenn Maxwell ने बनवली भारत, ऑस्ट्रेलिया अन् इंग्लंडची मिळून ODI XI; पण एकाही इंग्लिश खेळाडूला स्थान नाही, 'या' भारतीयांची निवड

Maharashtra Floods : पाचच जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल अंतिम, दिवाळीपूर्वी मदतीवर सावट; ४८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

जनसंपर्क, भ्रमंती आणि संस्कृतीचे दर्शन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT