kangana ranaut,kumar hegde
kangana ranaut,kumar hegde file photo
मनोरंजन

कंगनाच्या बॉडीगार्डला अटक; बलात्काराचा आरोप

प्रियांका कुलकर्णी

काही दिवसांपुर्वी अभिनेत्री म्हणजे कंगना रणावतचा (kangana ranaut) बॉडीगार्ड कुमार हेगडे (kumar hegde) विरोधात डी. एन. नगर पोलीस स्थानकात एका ३० वर्षीय ब्युटिशियनने गुन्हा दाखल केला होता. कुमार हेगडेला नुकतीच कर्नाटमधून अटक करण्यात आली आहे. कुमारवर लग्नाचे आमिष दाखवून फसणूक केल्याचा आणि बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. कुमारला त्याच्या गावामधून अटक करण्यात आली आहे.(kangana ranaut bodyguard kumar hegde arrested make artist complaint rape mumbai police)

पीटीआयला मुलाखत देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले,'मुंबई पोलिसांच्या एका टीमनं शनिवारी कुमार हेगडेला कर्नाटकमधून अटक केली आहे. कुमारने पीडित महिलेशी संपर्क साधणे बंद केले होते. त्यामुळे त्या महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. त्याने महिलेकडून पाच लाख रूपये घेतले. मात्र ते परत केले नाही असे तिने सांगितले आहे.'

पीडित महिलेने कुमारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये पीडित महिला एका चित्रपटाच्या शुटिंगवेळी कुमारला भेटली होती. त्यानंतर त्याने तिला लग्नासाठी विचारले होते. नंतर कुमारने महिलेला लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्यास सांगितले होते. तो तिच्याशी लग्न करणार असल्याने ती लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्यास तयार झाली. एकत्र राहताना कुमारला त्या महिलेने शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला. पण काही दिवसांनी त्याने तिला ते करण्यास भाग पाडले. आईची प्रकृती खराब झाल्याचे कारण सांगून कुमारने त्या महिलेकडून 5 लाख रूपये घेतले आणि तेव्हा पासून त्याने तिच्यासोबत संपर्क बंद केला.

याआधी देखील कंगनाच्या हेअर स्टाइलिस्ट ब्रेंडन एलीस्टर डी जीवर 2020मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT