Asha Parkeh Kangana Ranaut for calling friendship in Bollywood fake esakal
मनोरंजन

Asha Preakh On Kangana : 'तिला फार कळतं का'? ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी टोचले कंगनाचे कान

कंगनाच्या त्या वक्तव्यावर बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी त्यावर सणसणीत उत्तर दिले आहे.

युगंधर ताजणे

Asha Parkeh Kangana Ranaut for calling friendship in Bollywood fake: बॉलीवूडची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंगनानं पुन्हा एकदा बॉलीवूडमधील मैत्रीविषयी भाष्य केलं आहे. त्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे. आपण अनेक बॉलीवूडमधील मैत्रीच्या बातम्या बघतो किंवा त्यांचे ते फोटो, व्हिडिओ पाहतो पण त्यामागील अनेक गोष्टी आपल्याला माहीती आहेत का, यावर कंगना बोलली आहे.

कंगनाच्या त्या वक्तव्यावर बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी त्यावर सणसणीत उत्तर दिले आहे. त्याचीही चर्चा सुरु झाली आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या नृत्यानं आणि अभियनानं आशाजी यांनी चाहत्यांच्या मनात स्थान मिळवले आहे. त्यांनी दिलेलं उत्तर कंगनाच्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय आहे.

आशा पारेख यांनी काय उत्तर दिलं?

कंगनाच्या त्या वक्तव्यावरुन जेव्हा आशाजी यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी तिच्यावर परखड शब्दांत टीका केल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूडमध्ये ज्या मैत्रीविषयी बोलले जाते ती खोटी आणि नाटकी असल्याचे कंगना म्हणाली होती, त्यावर तुम्ही काय सांगाल असा प्रश्न आशाजी यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, मी वहिदा आणि हेलन एकमेकांच्या किती जवळ आहोत हे तुम्हाला माहिती आहे का?

आमच्यामध्ये किती मोठी मैत्री आहे याविषयी तुम्हाला काय माहिती, ती खूप घट्ट मैत्री आहे. त्यामुळे तिनं जे काही बोललं त्यावर बाकी काही सांगण्याची गरज नाही. तिला फार कळते का, एवढे वाटते तर तिलाच विचारा की, तिनं कुणाशी मैत्री केली आहे ते, कुणासोबत किमान मैत्री करण्याचा प्रयत्न तरी केला आहे का, असा प्रश्न आशाजी यांनी थेटपणे कंगनाला विचारला आहे. त्यावर आता कंगना त्यावर काय उत्तर देणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

कंगना काय बोलून गेली होती...

काही दिवसांपूर्वी कंगनानं न्युज १८ ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बॉलीवूड आणि बॉलीवूडमधील फ्रेंडशिपवरुन एक प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे वादाला सुरुवात झाली होती. ती म्हणाली होती की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळेजण एकमेकांसमोर आल्यावर कौतुकाचे शब्द बोलतात, स्तुती करतात पण प्रत्यक्षात तसे नाही.

समोरचा बोलून गेल्यानंतर त्याच्या पाठीमागे निंदा करण्यास काही सेलिब्रेटी मागेपुढे पाहत नाही. त्यामुळे सगळ्यांना एकमेकांचे मित्र म्हणावे की आणखी काही हे कळत नाही. दुसरीकडे राजकारणामध्ये समोरासमोर एकमेकांचे शत्रु आहेत. मात्र प्रत्यक्षात ते एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे आपण पाहतो. कंगनाच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT