Kangana Ranaut Bollywood Actress Tejas Movie esakal
मनोरंजन

Kangana Ranaut : बॉलीवूडच्या क्वीनचा पुन्हा दणका! 'तेजस' चित्रपटाची घोषणा

बॉलीवूडची क्वीन अशी ओळख असणाऱ्या कंगनाचा येत्या काळात एक नवीन चित्रपट समोर येतो आहे.

युगंधर ताजणे

Kangana Ranaut Bollywood Actress Tejas Movie : बॉलीवूडची क्वीन अशी ओळख असणाऱ्या कंगनाचा येत्या काळात एक नवीन चित्रपट समोर येतो आहे. त्याची गेल्या काही वर्षांपासून चर्चा आहे. यापूर्वी कंगनाच्या टीकू वेड्स शेरु नावाच्या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. नवाझुद्दीन सिद्धिकी आणि नवनीत कौर यांच्या त्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका होत्या. आता कंगनानं पुन्हा एक गुड न्यूज दिली आहे.

गेल्या वर्षी कंगनाच्या इमर्जन्सी नावाच्या चित्रपटाचा टीझर समोर आला होता. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटामध्ये कंगनानं इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. त्यानंतर आता तिच्या आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सोशल मीडियावर त्या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. तेजस असे त्या चित्रपटाचे नाव आहे.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या अशांतपर्वाचा घटनाक्रम जाणून घेऊया

कंगना रनोतचा आगामी चित्रपट 'तेजस' ची रिलीझ डेट जाहीर आली आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांच्या प्रॉडक्शन हाऊस आरएसव्हीपीच्या बॅनरखाली होत आहे. या चित्रपटात कंगना मुख्य भूमिकेत असून ती एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.

या प्रकल्पाची घोषणा झाल्यापासून चित्रपट रसिकांमध्ये प्रचंड चर्चा आणि उत्साह निर्माण झाला आहे. आता या चित्रपटाच्या रिलीझची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तेजसच्या टीमने पुष्टी केली आहे की हा चित्रपट 20 ऑक्टोबर रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.

तेजसची कथा हवाई दलाचे वैमानिक तेजस गिलच्या विलक्षण प्रवासाभोवती फिरते आणि आमचे हवाई दलाचे वैमानिक वाटेत अनेक आव्हानांवर कशी मात करतात हे दाखवून प्रत्येक भारतीयाला प्रेरणा आणि अभिमानाची भावना जागृत करण्याचा उद्देश आहे. प्रतिभावान सर्वेश मेवारा यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 20 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT