Kangana Ranaut Bollywood Actress esakal
मनोरंजन

Kangana Ranaut Filmography: कंगनाचे २९ पैकी १९ चित्रपट फ्लॉप, 'तेजस' चे काय होणार? 'क्वीन' ला मोठया हिटची गरज

कंगना ही स्वताला बॉलीवूडची क्वीन म्हणवते. दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या कंगनाच्या गेल्या काही चित्रपटांना प्रेक्षकांनी नाकारले आहे.

युगंधर ताजणे

Kangana Ranaut Bollywood Actress : कुणी काही का म्हणेना आपण जे बोलू तेच खरे आणि तेच वास्तव अशी भूमिका घेणाऱ्या कंगनाला यश हुलकावणी देताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत आली आहे. आता तिचा तेजस नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला असून तो हिट होणार की फ्लॉप असा प्रश्न कंगनाला पडला आहे.

कंगना ही स्वताला बॉलीवूडची क्वीन म्हणवते. दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या कंगनाच्या गेल्या काही चित्रपटांना प्रेक्षकांनी नाकारले आहे. काही दिवसांपूर्वी तिचा चंद्रमुखी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र ज्या वेगानं तो आला त्याच वेगानं परतही गेला. त्यामुळे आता तेजसकडून कंगना आणि कंगनाच्या चाहत्यांना मोठी अपेक्षा आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांच्या कौतुकास्पद प्रतिक्रिया होत्या.

‘१० ते १२ तास रिक्षा चालवून ५०० रुपये देखील सुटत नाही..'

येत्या काळात कंगनाचा भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित इर्मजन्सी नावाचा चित्रपट प्रदर्शित करणार आहे. त्याची जोरदार चर्चा आहे. त्याच्या टीझरला प्रेक्षकांनी,नेटकऱ्यांनी एवढेच नव्हे तर कंगनाच्या टीकाकारांनी देखील तिच्या भूमिकेचे आणि लूक्सचे कौतुक केले होते. त्यामुळे येत्या काळात हा चित्रपट कंगनासाठी महत्वाचा ठरणार आहे.

नुकत्यात हाती आलेल्या एका रिपोर्टनुसार कंगनाच्या २९ चित्रपटांपैकी १९ चित्रपटांना फ्लॉपचा सामना करावा लागला आहे. टीव्ही ९ ने याबाबत अधिक माहिती देणारे वृत्त दिले आहे. तनु वेड्स मन्नु भाग एक आणि दोन, क्वीन, मणिकर्णिका, थलाईवी या चित्रपटांना मोठी लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर मात्र कंगनाच्या अनेक चित्रपटांना अपयशाचा सामना करावा लागला आहे.

यानंतर कंगनानं निर्मिती क्षेत्रात स्वताची ओळख तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यात ती काही अंशी यशस्वी झाल्याचे दिसून आले. २००६ मध्ये गँगस्टर या चित्रपटातून सुरुवात करणाऱ्या कंगनाच्या आयुष्यात मधूर भांडारकर यांचा फॅशन नावाचा चित्रपट आला आणि तिचं आय़ुष्य बदलून गेलं. त्या चित्रपटातील भूमिकेनं तिला यशाच्या शिखरावर नेलं. त्यानंतर वन्स अपॉन टाईम इन मुंबईमध्ये देखील तिची भूमिका लोकप्रिय ठरली होती.

बॉलीवूड हंगामाच्या एका रिपोर्टसनुसार कंगनानं आतापर्यत २९ हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तेजस ही तिची ३० वी फिल्म आहे. यातील १९ फिल्म या फ्लॉप झाल्या आहेत. यामुळे आज प्रदर्शित होत असलेल्या तेजस नावाच्या चित्रपटाकडून कंगनाला मोठ्या अपेक्षा असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT