kangana and alia bhatt 
मनोरंजन

Kangana Vs Alia: मणिकर्णिका- गंगुबाईची 'नळावरची भांडणं'

सध्या बॉलीवूडची क्वीन कंगना (Kangana Ranauat) रनौत आणि आलिया भट्ट यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood Actress: संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आणि आलिया (Aila Bhatt) भट्टची प्रमुख भूमिका असलेला गंगुबाई काठियावाडी हा (Gangubai Kathiyawadi) चित्रपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला होता. त्याला अद्याप प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी तो इतर कारणांवरुन जास्त चर्चेत आला आहे. सध्या बॉलीवूडची क्वीन कंगना (Kangana Ranauat) रनौत आणि आलिया भट्ट यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झालं आहे. कंगनानं तिला गंगुबाईवरुन छेडलं होतं. अजून आलियाच्या गंगुबाईला म्हणावं असं यश मिळालेलं नाही. त्यामुळे निर्मात्यांची डोकेदुखी वाढली आहे. मणिकर्णिका आणि गंगुबाईची तुलना करण्यात आली तेव्हा मात्र ती चांगलीच भडकली आहे.

आलिया आणि कंगना या दोन्ही अभिनेत्रींच्या चित्रपटांवरुन जेव्हा वादाला सुरुवात झाली तेव्हा त्यात कंगनानं आलियाला चांगलाच टोला लगावला आहे. आलियावर निशाणा साधताना कंगनानं लिहिलं आहे की, मुव्ही माफियावाल्यांचे वेगळंच गणित आहे. 75 कोटींच्या मणिकर्णिकेनं 43 कोटींचा व्यवसाय केला तर त्याला काही मुव्ही माफियांनी त्याला उलटा डिझास्टर असं म्हटलं. दुसरीकडे 160 कोटींच्या गंगुबाईनं चित्रपटानं तीन दिवसांत 35 कोटी कमावले तर त्याला आता लोकं सुपरहिट म्हणायला लागले आहेत. कंगना पुढे म्हणते की, ही लढाई काही तिची आणि माझी नाही. काही गोष्टींबाबत माझी ठाम मतं आहेत.

मला एक गोष्ट पक्की माहिती आहे. ती म्हणजे टँलेटेड लोकांना इंडस्ट्रीमध्ये मरण नाही. तुम्ही कोणत्या पीआरविना, सिस्टमशिवाय, मुव्ही माफियाशिवाय चित्रपट सक्सेस करुन दाखवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. मला ते जास्त आव्हानात्मक वाटते. यापूर्वी कंगनानं लिहिलं होतं की, सध्या महिलाकेंद्री चित्रपटांचा ओढा वाढू लागला आहे. चांगली गोष्ट आहे. अशावेळी काही ठराविक निर्माते, दिग्दर्शकांच्या मागे मुव्ही माफिया उभे राहतात ही गोष्ट मात्र खटकणारी आहे. अशी खंत कंगनानं व्यक्त केली होती. आलियाच्या गंगुबाईनं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 10.5 कोटींची कमाई केल्याचे दिसून आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paytm Payments Bank: बँकिंग क्षेत्रात खळबळ! पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द; आरबीआयकडून मोठी कारवाई, धक्कादायक कारण समोर

RCB vs GT Live: साई सुदर्शनचे विक्रमी शतक! ख्रिस गेलचा सर्वात भारी विक्रम मोडला, शुभमन गिलसह बंगळुरुच्या गोलंदाजांना भिडला

Water Issue : भवानी पेठेत पाण्याअभावी नागरिकांचा संताप; रस्ता रोको आंदोलन

उच्च न्यायालयाचा बँक ऑफ बडोदाला दणका! सायबर फसवणुकीतील पैसे वृद्धेला परत करण्याचे आदेश

'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होते दीपिकाचे वडील; तिचं लग्न झाल्यावर बाथरूममध्ये बसून रडलेले, कोण आहे ती अभिनेत्री?

SCROLL FOR NEXT