Tanu Weds Manu 3  Esakal
मनोरंजन

Tanu Weds Manu 3: मनुला छळायला तनु परत येतेय! तेजसनंतर कंगनानं केली 'तनू वेड्स मनु'ची घोषणा!

कंगनाने तिच्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे.

Vaishali Patil

Tanu Weds Manu 3: कंगना राणौत ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी तेजस सिनेमासाठी चर्चेत होती. तिचा हा सिनेमा आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कंगनाने कसलीच कमी ठेवली नाही.

कंगनाने तिच्या या चित्रपटासाठी खुप मेहनत घेतली. याच बरोबर दिल्लीत पहिली रावण दहन करणारी महिला कंगना ठरली होती.आता कंगना पुन्हा चर्चेत आली आहे ती तिच्या आगामी सिनेमासाठी.

कंगनाने नुकतच IMDB ला एक मुलाखतीत तिच्या आगमी सिनेमाबाबत खुलासा केला आहे. कंगना आता आणखी तीन प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे ज्यात एक प्रोजक्ट एक विजय सेतुपतीसोबत आहे. हा एक थ्रिलर चित्रपटात असणार आहे.

त्याचबरोबर ती 'तनू वेड्स मनु 3' मध्ये पुन्हा तनूच्या भुमिकेत परतणार आहे. IMDb शी बोलताना कंगनाला म्हणाली की, "मी विजय सेतुपती सरांसोबत एक थ्रिलर सुरू करत आहे, आणि नोटी बिनोदिनी नावाचा चित्रपट आहे. तनु वेड्स मनू 3 हा तिचा दुसरा चित्रपट असणार आहे. याचाच अर्थ की कंगनाने तनु वेड्स मनू चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आता कंगनाच्या या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये खुपच आनंद आहे. कंगनाच्या चाहत्यांना तिच्या या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. या चित्रपटाचे याआधी दोन भाग प्रदर्शित झाले आहेत, ज्यांना प्रेक्षकांचे खुप प्रेम मिळाले आहे. आता चाहते या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

एकीकडे कंगनाने या चित्रपटाची घोषणा केली आहे तर दुसरीकडे दिग्दर्शक आनंद एल राय यांनी यापुर्वी या चित्रपटाचा सिक्वेल न काढण्याबाबत वक्तव्य केले होते.

2015 च्या एका मुलाखतीत आनंद यांनी या चित्रपटाचा तिसरा भाग बनवणार नाही असे सांगितले होते. आता या वक्तव्यानंतर आनंद दिग्दर्शक म्हणून या चित्रपटात काम करणार की नाही याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. तर आर माधवन देखील या चित्रपटाचा भाग राहणार नाही अशा बातम्या यापुर्वी आल्या होत्या.

तनु वेड्स मनु रिटर्न्ससाठी कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता . आता तिचा तेजस हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT