Kangana Ranaut,Deepika Padukone Instagram
मनोरंजन

Video: कंगना महिला पत्रकारावर भडकली;दीपिकावरून विचारलेला प्रश्न खटकला

एकता कपूरच्या आगामी 'लॉकअप' या रीअॅलिटी शो चं प्रमोशन करण्यासाठी ती आली होती.

प्रणाली मोरे

कंगना रनौत(Kangana Ranaut) नुकतीच एकता कपूरच्या(Ekta Kapoor) आगामी 'लॉकअप' या रीअॅलिटी शो चं प्रमोशन करण्यासाठी एका कार्यक्रमात आली होती. ती हा शो होस्ट करणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच येणाऱ्या या शो च्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने कंगनाला दीपिका पदुकोण(Deepika Padukone)वरुन प्रश्न विचारताच ती भडकली. त्याचं झालं असं की,काही दिवसांपूर्वी 'गहराइयां' या आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दीपिकानं घातलेल्या ड्रेसवरुन ती ट्रोल झाली होती. वादाचाच विषय निर्माण झाला होता असं म्हणूया नं. त्या दीपिकाच्या वादातीत मुद्द्यावरून कंगनाला प्रश्न केला असता तीनं पत्रकाराच्या त्या प्रश्नावर असा पलटवार केला की उपस्थित केवळ तोंडात बोट घालून पाहत बसले.

सेलिब्रिटी फोटोग्राफर मार्केटिंग बाय राज या इन्स्टाग्राम अकाउंटवरनं शेअर केलेला तो व्हिडीओ आम्ही इथे बातमीत जोडलेला आहे.

कंगनाला पत्रकारानं असा प्रश्न केला होता की,'दीपिका पदूकोणला तिच्या ड्रेसवरुन ट्रोल केलं गेलं,अजुही करीत आहेत, तर हा मुद्दा महिला सक्षमीकरणाबाबतीत आजही आपण किती बुरसटलेले आहोत हे दाखवतो का?' यावर कंगना पटकन म्हणाली कशी,''मी इथे दीपिकाला वाचवण्यासाठी बसलेले नाही,ना तिच्या बाजूने बोलण्यासाठी,तिचं रक्षण करायला ती समर्थ आहे. ती एक पब्लिक फिगर आहे. तिच्याकडे पैसा आहे,पावर आहे. ज्याचा उपयोग करून ती लढू शकते. मी अशा लोकांसाठी इथे आहे जे अन्यायाविरोधात आवाज उठवू शकत नाहीत. दीपिकाकडे स्वतःचा आवाज आहे,चाहतावर्ग आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तिच्या फिल्मचं प्रमोशन करायला इथे बसलेले नाही. मी माझ्या शो चे प्रमोशन करायला इथे आले आहे''. आणि तडक समोरच्या प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकाराला म्हणाली कशी,''तुम्ही आता खाली बसू शकता? आपण बाहेर याविषयावर चर्चा करूया. मी ४५ मिनिटं देते''. तिच्या या अशा उर्मट उत्तरामुळे मात्र सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Deepika Padukone, Kangana Ranaut

दीपिका ट्रोल झाली होती ती 'गहराइयां' या तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनवेळी तिनं बोल्ड ड्रेस घातल्यामुळे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फ्रेडी बर्डी ने दीपिकावर अशी कमेंट केली होती की,''बॉलीवूड चा न्यूटन नियम,जसजसे 'गहराइयां' सिनेमाची प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे तसतसे अभिनेत्रींचे कपडे छोटे होत जात आहेत''. यावर उत्तर देताना दीपिका म्हणाली होती,''शास्त्रज्ञांच्या सांगण्यानुसार आपलं ब्रम्हांड प्रोटॉन,न्युट्रॉन,इलेक्ट्रॉन यांनी मिळून बनला आहे..पण ते मुर्खांविषयी सांगायला विसरून गेले''. अशा पद्धतीनं आपल्या उत्तरानं दीपिकानं फटकारलं होतं. पण आता पुन्हा कंगनानं दीपिकाविषयी बोलून आणखी एक वादाचा मुद्दा उकरून काढला आहे. आता मीडिया दीपिकाला कंगनाविषयी छेडणार हे ठरलेलंच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Retirement : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कधी निवृत्त होणार? उत्तराधिकारी म्हणून कोणाचे नाव चर्चेत?

२७ वर्षांची सर्विस, कॉन्स्टेबलचा DSP बनला; जमवली ३०० कोटींची माया, ८ ठिकाणी छाप्यात सापडले नोटांचे बंडल

Nagpur Ganesh Visarjan,: डीजे, लेजर लाईटवर पोलिसांची करडी नजर; ठाणेनिहाय ४४ ध्वनी मापक यंत्रे

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

SCROLL FOR NEXT