kangana Ranaut Team esakal
मनोरंजन

'गंगेत वाहणारे मृतदेह भारताचे नव्हेत तर नायजेरियाचे'...

तिनं तिच्या फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - अभिनेत्री कंगणाला (Kangana Ranaut) सोशल मीडियावरुन आता पुन्हा ट्रोल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कंगणाला व्टिटरनं तिचं अकाऊंट सस्पेंड केलं होतं. मात्र शांत बसेल ती कंगणा कसली. तिनं पुन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा वेगवेगळ्या प्रकारची प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल ती बोलली होती. त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. आताही कंगणा चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे गंगेत वाहत असलेल्या मृतदेहांविषयी तिनं भाष्य केलं आहे. (Kangana Ranaut Facebook Video Goes Viral Says Floating Bodies Around Ganga Are Of Nigeria)

कंगणानं (Kangana Ranaut) दुस-या एका प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्य़ा भावना व्यक्त केल्या आहेत. तिनं तिच्या फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये कंगणानं इस्त्राईल, पॅलेस्टाईन आणि गंगेत वाहत असलेल्या मृतदेहांबाबत भाष्य केले आहे. कंगणानं ईदच्या चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. तिनं जो व्हिडिओ शेअर केला आहे त्याविषयी चर्चा सुरु झाली आहे. याचा परिणाम म्हणजे कंगणा मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली आहे.

कंगणानं(Kangana Ranaut) चाहत्यांना ईद, अक्षय तृतीया आणि परशुराम जयंतीच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सगळं जग सध्या कोरोनाशी लढा देत आहे. सगळीकडे परिस्थिती गंभीर आहे. काही ठिकाणी दोन देशांमध्ये संघर्षही सुरु आहे. मला असे वाटते की, आताच्या परिस्थितीमध्ये आपण संयम ठेवणे गरजेचे आहे. यावरुन धडा घ्यायचा झाल्यास सध्या इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन मध्ये ते पाहावं असं कंगणा म्हणते. काही निवडक माणसे अशी आहेत की ज्यांनी सहा ते सात देशांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका आजीबाईंचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावेळी ती रस्त्यावर ऑक्सिजन मास्क लावून बसली होती. हे सगळं आता ग्लोबल लेव्हलवर व्हायरल होत आहे. या गोष्टीचे उदाहरण देत कंगणा (Kangana Ranaut) सांगते की, सध्या गंगा नदी किना-यावरील फोटो व्हायरल होत आहेत त्या पाण्यामध्ये जे मृतदेह वाहत आहेत ते भारताचे नाही तर नायजेरियाचे आहेत. येथे राहणारे लोक असे का करत आहेत, ते आपल्याच पाठीत सूरा खुपसत आहेत. ही अशी माणसे आहेत ते कुठल्याही एका धर्माचे नाहीत. ते नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी आढळून येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs MI Live: ना तुला, ना मला... दीपक चहर अन् रॉबिन मिंझ यांची 'पाकड्यां'सारखी फिल्डींग; हार्दिक पांड्यावर तोंड लपवण्याची वेळ Video

KKR vs MI Live: दीपक चहरने कोलकाताच्या फॅन्सना डिवचले; Finn Allen ची विकेट, सूर्याला थांब म्हणाला अन् पुढे काय केले ते पाहाच Video

Tamil Nadu Politics: तमिळनाडू सरकार अडचणीत? राष्ट्रपती राजवटीची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, प्रकरण काय?

Konkan Tourism : तारकर्लीत ‘आयएनएस गुलदार’चे पाण्याखालील संग्रहालय; नियंत्रित जलसमाधीमुळे कोकण पर्यटनाला नवी ओळख

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर पुण्यातील आरसीसी मोटेगावकर क्लासला महापालिकेची टाळेबंदी

SCROLL FOR NEXT