Kangana Ranaut Getting Married:  Esakal
मनोरंजन

Kangana Ranaut Getting Married: कंगना करतेय लग्न? कार्ड वाटून पॅप्सला दिल निमंत्रण..पण नवरदेव कोण?

Vaishali Patil

Kangana Ranaut Getting Married: बॉलिवूडची पंगा क्विन म्हणुन ओळख असलेली कंगना रणौत हिची वेगळी ओळख सांगायची गरज नाही. कारण ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

कंगना सोशल मिडियावर कमालीची सक्रिय आहे. नुकतच कंगनाने करण जोहरच्या 'रामायण' चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल तिने सांगितल्या प्रमाणे बॉलिवूडच्या माफिया गँगवर सडकून टिका केली. इतकच नाही तर तिने रणबीर कपूरला दुर्योधन आणि करण जोहरला शकूनी मामा बोलली.

आता कंगनाच्या या वक्तव्याची चर्चा सुरु असतांनाच कंगना बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. कंगणानं चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. ज्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कंगना लग्न करतेय आणि ती चक्क लग्नाची पत्रिका पापाराझींना वाटताना दिसत आहे.

कंगना राणौतचा एक व्हिडिओ विरल भयानी यांने शेयर केला आहे. ज्यात कंगनाच्या ऑफिसबाहेर मीडियाची खुप गर्दी जमली आहे. याव्हिडिओत एक रिपोर्टर बोलत आहे, "जसं तुम्ही सगळे पाहू शकता की कंगना रणौतचं ऑफिस वधूसारखे सजलं आहे, त्यामुळे कंगना राणौतचे अखेर लग्न करणार आहे हे अशा चर्चा सुरु आहे. हे खरे आहे का?"

तितक्यात कंगना कारमधुन एन्ट्री घेते आणि जेव्हा मीडियाने कंगनाला विचारले की लग्नाबाबत बातमी खरी आहे का तेव्हा ती म्हणते की, बातमी तर तुम्ही पसरवतात, मी फक्त एक चांगली बातमी देतो. तुम्ही सगळे नक्की याल.

आता आम्ही तूम्हाला सांगतो की खर तर कंगना लग्न करत नाही आहे. तिने मीडियाला जी लग्नपत्रिका दिली त्यावर 'टिकू वेड्स शेरू' असं लिहिलेले होते.

या व्हिडिओच्या माध्यमातून कंगना तिच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये तयार होत असलेल्या 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.

अवनीत कौर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर चित्रपट टिकू वेड्स शेरूचे दिग्दर्शन साई कबीर यांनी केले आहे. कंगना या चित्रपटाची निर्माती आहे. 'टिकू वेड्स शेरू' हा चित्रपट 23 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT