Bollywood actress Kangana ranaut
Bollywood actress Kangana ranaut  esakal
मनोरंजन

ज्ञानवापी मशिद प्रकरणावर कंगना कडाडली! 'काशीच्या कणाकणात....'

युगंधर ताजणे

Bollywood News: कंगना केव्हा काय बोलेल याचा नेम नाही. ती नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे, गेल्या काही वर्षांपासून (Bollywood Actress) कंगनानं केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिला वेगवेगळ्या प्रकारे नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. सध्या देशात ज्ञानवापी मशिदीचा वाद सुरु झाला आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात दाखल आहे. काही (Kangana Ranaut) दिवसांपासून ज्ञानवापी मशिदी प्रकरणानं साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावरुन देखील या घटनेला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे ट्रोल केले आहे. यासगळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिक्रिया दिली आहे. बॉलीवूडची क्वीन कंगनानं केलेली टिप्पणी चर्चेत आली आहे.

आपल्या परखड प्रतिक्रियांसाठी ओळखली जाणारी कंगनानं जेव्हा ज्ञानवापी मशिदीवर प्रतिक्रिया दिली तेव्हा तिच्यावर काहींनी टीका केली आहे. ती सध्या तिच्या आगामी धाकड चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. यावेळी कंगना वाराणसीला गेली होती. तिच्यासमवेत अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता कलाकारही होते. वाराणसीला काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर तिनं प्रतिक्रिया दिली आहे. त्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. यावेळी तिनं ज्ञानवापी मशिदीकडे चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. कंगनानं काशीची तुलना ही मथुरा आणि अयोध्याशी केली. तिनं अप्रत्यक्षपणे ज्ञानवापी प्रकरणावर टीका करताना सांगितलं की, याठिकाणच्या प्रत्येक कणाकणात शिव आहे. त्यासाठी आणखी कोणत्या आकाराची, रचनेची गरज नाही.

कंगना धाकडच्या प्रमोशनसाठी वाराणसीला गेली होती. यावेळी तिला मीडियाच्या काही लोकांनी प्रश्न विचारले. त्यावर कंगना जे बोलली ते सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहे. जसं मथुरेच्या कणाकणात कृष्ण आहे तसं अयोध्येच्या कणाकणात राम आहे, त्याचप्रमाणे काशीच्या कणाकणात शिव आहे. असं कंगणानं आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT