Kangana Ranaut Esakal
मनोरंजन

Kangana Ranaut: कंगनाच आमची देवी! चाहत्याने केली फोटोची पुजा आरती... व्हिडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती बॉलिवूडमधील काही लोकांवर नेहमीच टिका करत असते.

ती त्यांना बॉलिवूड मफिया म्हणत असते. नुकतच प्रियंकाने ज्यावेळी बॉलिवूडमध्ये राजकारण चालतं असं सांगतिलं त्यावेळी कंगनानं लगेच प्रतिक्रिया दिली.

कंगनालाही नेहमीच या बॉलिवुड गँगकडून टार्गेट केलं जातं असंही ती म्हणतं असते. त्याचबरोबर कंगना वक्तव्यामुळेही चर्चेत असते.

कंगना तिच्या स्पष्टवक्ते विधानांमुळे चर्चेत असली तरी तिच्या चाहत्यांची संख्या काही नाही. कंगनाच्या अशाच एका चाहत्याच्या क्रेझमुळे चर्चेत ती आली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तिची चाहती कंगनाची आरती करत आहे.

खरं तर हा व्हिडिओ जूना आहे . हा व्हिडिओ कंगनाच्या वाढदिवसाच्यावेळीचा आहे. मात्र सध्या तो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

कंगना राणौतच्या वेड्या चाहतीने अभिनेत्रीला ट्विटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिने कंगनाच्या 36 व्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती भिंतीवर कंगना राणौतच्या फोटोची आरती करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये ती ‘हॅपी बर्थडे टू यू’ असे म्हणताना दिसत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा क्विन, देव तुला आशीर्वाद देईल." असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे.

आता या व्हिडिओवर खुद्द कंगना राणौतनेही प्रतिक्रिया दिली आहे. तिने फॅनचे आभार मानले आहेत. हा व्हिडीओ केवळ नऊ सेकंदांचा आहे मात्र त्यावर लोकांच्या खूप प्रतिक्रिया येत आहेत. अशाप्रकारे कंगनाची आरती केल्याचे पाहिल्यानंतर अनेकजण कंगनाची आणि तिच्या चाहत्यांची खिल्ली उडवत आहेत. तर अनेकजण कंगना ही त्यांची लाडकी अभिनेत्री असल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

SCROLL FOR NEXT