Kangana ranaut, Karan Johar Google
मनोरंजन

'करिअर संपलंय त्या कळलाव्याचं'; कंगनानं पुन्हा साधला करण जोहरवर निशाणा

कंगना रनौत आणि करण जोहर एकमेकांविरोधात बोलायची एकही संधी सोडत नाहीत.

प्रणाली मोरे

बॉलीवूडमध्ये ज्यांच्या-ज्यांच्यात भांडणं झाली आहेत भले त्यांच्यातील वाद संपतील पण असं वाटतंय की करण जोहर(Karan Johar) आणि कंगना(Kangana Ranaut)मधील रुसवे-फुगवे संपणारच नाहीत कधी. कंगनानं काही दिवसांपूर्वी तिची 'टिकू वेड्स शेरु' अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होईल असं म्हटलं होतं. पण त्यानंतर असं काय झालं की कंगनानं लगेचच करण जोहरवर हल्लाबोल केला आहे.

करण जोहरने काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सची ग्लोबल चीफ बेला बजारिआसाठी एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं. कंगनानं आपल्या पोस्टच्या माध्यमातून या पार्टीवर निशाणा साधत करण जोहरचं नाव नं घेता त्याच्यावर टीका केली होती. कंगना रनौत म्हणाली होती,''जिथे नेटफ्लिक्सची हेड इंडस्ट्रीतून गायब होत चाललेल्या दिग्दर्शकाच्या पार्टीत बिझी आहे,तिथे अॅमेझॉन प्राइम व्हिडीओचे हेड मात्र चांगला कॉन्टेंट आपल्या प्लॅटफॉर्मवर देणाऱ्यांसोबत बिझी होते''.

Kangana Ranaut's Insta story Post Image

कंगना रनौतनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर करताना पोस्टमध्ये लिहिलं आहे,''भारतात नेटफ्लिक्सपेक्षा अॅमेझॉन प्राइमची सदस्य संख्या जास्त आहे हे आकड्यांनी स्पष्ट केलंच आहे. खुप हुशार आणि तांत्रिकदृष्ट्या पुढारलेले लोक अॅमेझॉनकडे आहेत यामुळेच हे सगळं शक्य झालं आहे. अॅमेझॉन प्राइमचे इंटरनॅशनल हेड भारतात येतात पण जुन्या ९० सालातल्या दिग्दर्शकांच्या बदनाम होणाऱ्या पार्ट्यांमध्ये जात नाहीत. यापेक्षा ते अशा लोकांना भेटणं पसंत करतात जे त्यांच्या प्लॅटफॉर्मसाठी चांगलं काम करतात. गेल्यावेळी मी ऐकलं होतं की नेटफ्लिक्सचे हेड भारतीय मार्केटचा अभ्यास करण्यात असमर्थ राहिले आहेत. भारतीय मार्केट म्हणजे काही फक्त गॉसिप करणाऱ्या एका ९० सालातल्या बॉलीवूड दिग्दर्शकापुरता मर्यादीत नाहीय इथे खूप प्रतिभावान लोकं काम करतात'.

करण जोहरने काही दिवस आधीच नेटफ्लिक्स ग्लोबल टी.व्हीची हेड बेला बजारियासाठी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत शाहरुख खान,गौरी खानपासून ते आलिया भट्ट,रणवीर सिंग,सारा अली खान,माधुरी दिक्षित पर्यंत मोठे स्टार्स सामिल झाले होते.

कंगनानं याआधी देखील अनेकदा करणवर हल्लाबोल केला होताच. दोघांमध्ये तेव्हा बिनसलं जेव्हा कंगनानं करणच्या 'कॉफी विथ करण' शो ला 'नेपोटिझमला प्रोत्साहन देणारा शो' म्हटलं होतं. यानंतर कंगनानं करण जोहरला 'मूव्ही माफिया' देखील म्हटलं होतं. त्यानंतर करण जोहरनंही कंगनावर पलटवार करताना तिला 'वूमन कार्ड' आणि 'व्हिक्टिम कार्ड' खेळत आहे असं म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Car Loan: नवीन कार घेणार असाल तर खुशखबर! 'या' बँका देत आहेत कार कर्जावर सर्वात कमी व्याजदर, एकदा यादी पाहाच!

बनावट दारु विक्री! देशी-विदेशी दारू, हातभट्टी अन्‌ विविध विदेशी ब्रॅंडची बनावट टोपणे जप्त; सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची कारवाई

Kidney Trafficking Racket: धक्कादायक! केवळ रोशन कुडेनेच नव्हे, तर आणखी चार युवकांनीही विकली किडनी

Pune Crime : जामखेडनंतर सासवडमध्येही खून; पुणे ग्रामीण पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा केला पर्दाफाश!

SCROLL FOR NEXT