Kangana Ranaut looks stunning in the 'Chandramukhi 2' first look poster viral fans love it vnp98  esakal
मनोरंजन

Chandramukhi 2: अवतरली सुंदरा! कंगनाच्या 'चंद्रमुखी 2' चा फर्स्ट लूक रिलिज..

Vaishali Patil

Kangana Ranaut New Movie : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही पंगा क्विन म्हणुन ओळखली जाते. ती तिच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. ती तिच्या अभिनयानाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. सध्या कंगना तिच्या चंद्रमुखी 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

चंद्रमुखी 2' मधील कंगना राणौतचा फर्स्ट लूक समोर आला आहे. कंगनाला या लूकमध्ये पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. यासोबत तित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही निर्मात्यांनी शेयर केली आहे. हा चित्रपट सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. तो साऊथच्या ब्लॉकबस्टर सिनेमाचा सिक्वेल आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर 'चंद्रमुखी 2' चा पहिला लूक शेअर करत कॅप्शन लिहिले आहे, 'सौंदर्य आणि पोझ. चंद्रमुखी २ मधील कंगना राणौतचा फर्स्ट लूक. '

कंगनाचा हा लूक प्रेक्षकांना खुप आवडला आहे. कंगनाचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये रिलिज होणार आहे.

'चंद्रमुखी 2' सिनेमा बद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा 2005 साली आलेल्या चंद्रमुखीच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वेल आहे.

चंद्रमुखीच्या पहिल्या भागात रजनीकांत डॉ. सरवणन आणि वेट्टय्यान राजा यांच्या भूमिकेत होते. तर ज्योतिका ही 'चंद्रमुखी'च्या भुमिकेत होती. चंद्रमुखी 2 वेट्टय्यान राजा आणि कंगना चंद्रमुखीच्या भूमिकेत या चित्रपटातुन प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

कंगना राणौतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच तिच्या 'इमर्जन्सी' आणि 'तेजस' चित्रपटात दिसणार आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT