Kangana Ranaut Google
मनोरंजन

कंगनाच्या ताफ्यात आली महागडी Mercedes Maybach, किंमत ऐकून उंचावतील भुवया

'धाकड' सिनेमाच्या प्रदर्शनाआधी कंगनानं स्वतःलाच एक सुंदर कार गिफ्ट म्हणून दिली आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूडची बिनधास्त अन् बेताल वक्तव्य करण्यात प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना रनौत आपल्या 'धाकड'(Dhaakad) सिनेमामुळे सध्या भलतीच चर्चेत आहे. कंगना(kangana Ranaut) अनेकदा तिच्या वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आली आहे अन् त्यामुळे देखील तिला नकळत वाईट का होईना पण प्रसिद्धी मिळाली आहे. आता 'धाकड' सिनेमाची प्रदर्शनाआधी चर्चा रंगली असताना कंगना एका वेगळ्याच कारणामुळे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाआधी कंगनानं स्वतःलाच एक सुंदर गिफ्ट दिलं आहे.

कंगनाच्या नव्या कारची रंगली चर्चा...

बॉलीवूड क्वीन कंगना रनौतनं नवी कार(New Car) खरेदी केली आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. कंगनाच्या या नवीन कारची ब्रेकिंग बातमी सेलिब्रिटी फोटोग्राफर Voompla ने दिली आहे.

गाडी खरेदी करायला गेलेल्या कंगनाच्या ब्लॅक आऊटफिटवर खिळल्या नजरा...

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत कंगना काळ्या रंगाच्या प्रिंटेड ड्रेस असलेल्या आऊटफिटमध्ये आपल्या कुटुंबासोबत दिसली. या व्हिडीओत तिच्या बाजूलाच नवी कोरी मर्सिडीज कार उभी दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत कंगनाची आई नव्या गाडीची पूजा करताना दिसत आहे.

कंगनाच्या गाडीची किंमत ऐकून व्हाल थक्क

कंगनाच्या नव्या गाडीची किंमत ऐकून तुम्ही थक्क न झालात तर नवल. कंगनाच्या त्या स्टायलिश Merceded Maybach चं मॉडेल आणि किंमत समोर आणणारा एक तिसरा व्हिडीओ देखील Voompla ने शेअर केला आहे. फोटोग्राफरच्या पोस्टमधून मिळालेल्या माहितीनुसार कंगनानं मर्सिडिज मेबैच S680 मॉडेल खरेदी केल्याचं बोललं जात आहे. ज्याची शो रुम किंमत २.५ ते ३.५ करोड रुपये आहे. आणि ऑन रोड गाडी येईपर्यंत तिची किंमत ४ करोड पर्यंत पोहोचेल असं बोललं जात आहे. अद्याप आपल्या या नव्या गाडीसंदर्भात कंगनाकडून अधिकृतरित्या कोणतीही बातमी देण्यात आलेली नाही.

कंगनानं वयाच्या २१ व्या वर्षी आपली पहिली गाडी BMW 7 खरेदी केली होती. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्ताच्या आधारे म्हटलं जात आहे की, कंगनानं ही कार २००८ मध्ये खरेदी केली होती. त्यानंतर तिला त्या कारचं ब्रॅन्ड अॅम्बेसेडर बनवलं गेलं होतं. एका कार लॉंच दरम्यान या गोष्टीचा खुलासा झाला होता की,तिनं स्वतः तिची पहिली गाडी खरेदी केली होती,तिला कोणीही ती गाडी गिफ्ट केलेली नव्हती.

कंगनाकडे एकापेक्षा एक शानदार आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. कंगनानं बीएमडब्ल्यू सीरिजमध्ये आपली पहिली गाडी खरेदी केली होती. त्यानंतर तिनं जगभरात महाग समजल्या जाणाऱ्या गाड्या देखील खरेदी केल्या,ज्यामध्ये 'मर्सिडिज बेंज जीएलई क्लास एसयूवी' चा देखील समावेश आहे. त्या कारची किंमत जवळपास १.२५ करोड इतकी आहे. आता या यादीत Merceded Maybach चा देखील समावेश झाला आहे.

मीडियाला मिळालेल्या वृत्तानुसार कंगना रनौतची एकूण संपत्ती १३ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ९६ करोड रुपये आहे. अभिनयाच्या माध्यमातून ती सगळ्यात जास्त कमाई करते. या व्यतिरिक्त ब्रॅंडच्या जाहिराती,मॉडेलिंग या माध्यमातूनही ती चांगले पैसे कमावते असं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT