Kangana Ranaut On Atiq Ashraf Murder: Esakal
मनोरंजन

Kangana Ranaut: 'तर अधर्माचा नाश..', अतिकच्या एन्काऊंटरनं कंगणा खुश! योगींची तुलना थेट प्रभू श्रीरामाशी

Vaishali Patil

Kangana Ranaut On Atiq Ashraf Murder: प्रयागराज येथे वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दोन ते तीन हल्लेखोरांनी अतिक आणि अशरफ यांच्यावर गोळीबार केला.

त्यानंतर सर्वत्र याच प्रकणाची चर्चा सुरु आहे. त्यातच या प्रकरणवरुन अनेक स्तरावरुन प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. त्यातच मनोरंजन विश्वातुनही यावर प्रतिक्रिया आली आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने उत्तर प्रदेशातील या हत्येवर तिच्याच अंदाजात प्रतिक्रिया दिली आहे.

कंगना राणौत तिच्या स्पष्टवक्ते आणि वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहे. अनेक मुद्द्यांवर खुलेपणाने आपले मत मांडण्यासाठी ही अभिनेत्री ओळखली जाते. यापूर्वीही अतिकचा मुलगा असद अहमदच्या एन्काऊंटरनंतरही कंगना राणौतने आनंद व्यक्त केला होता.

कंगना रणौतने रविवारी सकाळी एका इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सीएम योगींचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की धर्म केवळ त्याचं पालन करुन नव्हे तर अधर्माचा नाश करुन होतो.

कंगना राणौतने तिच्या पोस्टमध्ये कुठेही थेट अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्ये उल्लेख केलेला नसला तरी या पोस्टमध्ये सीएम योगींच्या मीम्स आणि धर्म अधर्माचा उल्लेख केल्याने तिचं लक्ष्य काय आहे हे स्पष्ट झाले आहे.

कंगना रणौतने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, "धर्मग्रंथ सांगतात की धर्माची स्थापना केवळ धर्माचं पालन केल्याने नाही होत, तर अधर्माचा नाश केल्याने होतो." पुढे तिने लिहिले आहे, "अयोध्येला तपस्वी राजांची परंपरा आहे, ज्यांनी भारताचे रक्षण केले... जय श्री राम."

Kangana Ranaut On Atiq Ashraf Murder:
Kangana Ranaut On Atiq Ashraf Murder:
Kangana Ranaut On Atiq Ashraf Murder:

या पोस्टमध्ये कंगनाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो टाकला आहे आणि व्हायरल झालेल्या मीम्सची ओळ शेअर केली आहे, ज्यामध्ये लिहिले आहे, "आप लोग रोना बंद कीजिए मेरे तक आवाज आ रही है".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Loan Waiver Update : शेतकरी कर्जमाफीचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार, अधिकाऱ्यांच्या रजा-सुट्या रद्द; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना

IPL 2026: ईशान किशनने CSK च्या चाहत्यांची खिल्ली उडवताना मर्यादा ओलांडली? आर अश्विन म्हणतोय, '...तर ईगो कशासाठी?

Mumbai News: वांद्र्यात वातावरण चिघळलं! पोलिसांकडून लाठीचार्ज, स्थानिकांकडून दगडफेक; व्हिडिओ व्हायरल

Record: वैभव सूर्यवंशी भारतीय फलंदाजांमध्ये ठरला टॉपर! इशान, तिलक, संजूवर पडला भारी; आणखी दोन धावा अन् वर्ल्ड रेकॉर्ड नावावर...

Maharashtra Political Devlopments : कार्यकर्त्यांना लाल दिव्याची वाहने मिळणार? महायुतीमध्ये महामंडळ वाटपाला वेग; पुढील महिन्यात अंतिम निर्णयाची शक्यता

SCROLL FOR NEXT