kangana ranaut 
मनोरंजन

लसीकरणाच्या शुभारंभावर कंगनाची प्रतिक्रिया; शेअर केला खास व्हिडिओ

सकाळ ऑनलाईन टीम

सोशल मीडियावरील टिवटिवने प्रत्येक गोष्टींवर व्यक्त होणारी बॉलिवूड क्विन कंगना रणौतने लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतरही आपले मत व्यक्त केले आहे. ट्विटरवरुन तिने मोजक्या शब्दात  प्रतिक्रिया देताना एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत चांगलीच चर्चेत आहे. तेव्हापासून सोशल मीडियावर दिलेल्या तिच्या अनेक प्रतिक्रियांमुळे वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. देशात घडणाऱ्या अनेक घडामोडींवर ती आपलं मत व्यक्त करत असते.

आता देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर कंगनाने आपल्या मनताही भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली. एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी स्वत:ला लस टोचून घेतली. हा व्हिडिओ कंगनाने ट्विटरवरुन शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कंगनाने म्हटलं की, "अद्भूत! वाट पाहू शकत नाही" या आशयासह तिने संबंधित व्हिडिओ आपल्या अधिकृत अकाउंटवरुन शेअर केलाय.

कोरोना विषाणूच्या लसीचे दोन डोस दिले जात आहेत. दोन डोसमध्ये 21 दिवसांचे अंतर असणार आहे. लसीकरण मोहिमेमुळे कंगनाने तिचा आनंद व्यक्त केला आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वी 'मणिकर्णिका' चित्रपटाचा सिक्वल तयार करणार असल्याची घोषणा केली होती. चित्रपटाचे नाव मणिकर्णिक रिटर्न ऑफ द दिद्दा असेल असं सांगितलं होतं.

कंगनाच्या घोषणेनंतर पुस्तक लेखकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोपही केला आहे. कंगना सध्या तिच्या 'धाडक' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात ती गुप्तहेरांच्या भूमिकेत दिसणार आहे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित 'थलैवी' या आगामी चित्रपटामध्येही कंगना काम करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT