Kangana Ranaut and Elon Musk Esakal
मनोरंजन

Elon Muskच्या ट्विटवरुन कंगणाला आठवलं हृतिक सोबतचं प्रेम म्हणाली, 'माझ्या प्रेमप्रकरणामुळे'

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत हिची मनोरंजन विश्वात वेगळीच ओळख आहे. ती केवळ तिच्या दमदार अभिनयासाठीच नाही तर तिच्या वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध आहे. कंगना केवळ एखाद्याच मुद्यावर तिचं मत मांडत नाही तर तिचं वैयक्तिक आयुष्य असो वा देशाच्य काही घडामोडी इतकच नाही तर ती जगाच्या ज्वलंत प्रश्नावरही भाष्य करत असते. यामुळे ती नेहमीच चर्चेत येते.

काही वर्षापुर्वी कंगना तिच्या हृतिक रोशनसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली होती. त्याच नातं फार गाजल. कंगना रनौत आणि हृतिक रोशनचे नाते अचानक कसे तुटले हे आजपर्यंत कळलेले नाही. हृतिकने याबद्दल कधीच भाष्य केलेलं नसलं तरी कंगना नेहमीच याविषयावर नाव न घेता त्याला टोमणे मारत असते.

आता तर ती ट्विटर वरही पुन्हा परतली आहे. त्यानंतर ती खुप सोशल मिडियावर सक्रीय झाली आहे. ती रोजच काही ना काही ट्विट करत असते. आता त्यातच कंगना रणौतने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मानल्या जाणाऱ्या इलॉन मस्कच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

त्याच झालं असं की इलॉन मस्कने एक फोटो शेअर केला आहे ज्यावर लिहिले आहे की, 'प्रेमात पडणे ही एक वेगळी भावना आहे, विशेषत: जेव्हा तुम्हाला हे माहित असतं की तो फक्त तुमचं लक्ष विचलीत करण्यासाठी CIAने पैसे देवुन पाठवलेला अभिनेता आहे.'

आता हे प्रेमाशी संबधित ट्विट होतं आणि त्यात समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या आशयाचं होतं. आता कंगना रणौतने इलॉन मस्कच्या ट्विटवर कमेंट केली, "मला कधीच वाटले नव्हते की माझ्यापेक्षा दुस-याचे आयुष्य जास्त नाट्यमय असू शकतं, सगळा फिल्म माफिया मला माझ्या प्रेमप्रकरणामुळे जेलमध्ये पाठवु पाहत होता. हे तर त्याहूनही रंजक आहे.

कंगणाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत कंगना राणौत दिसणार आहे. कंगनासोबत या चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, विशाक नायर आणि दिवंगत सतीश कौशिक यांच्याही भूमिका आहेत.

कंगना राणौत लवकरच 'चंद्रमुखी 2' या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये ती राघव लॉरेन्ससोबत दिसणार आहे. 'चंद्रमुखी' या हिट तमिळ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. कंगना 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लेजेंड ऑफ दिद्दा' या चित्रपटातही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT